Boat Accident प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - फेसबुक)

Katihar Boat Accident: बिहार (Bihar) मधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. कटिहार (Katihar) मध्ये छठपूजेपूर्वी (Chhath Puja) मोठा अपघात झाला आहे. कटिहारमधील मनिहारी ब्लॉकच्या केवला घाटाजवळ एक बोट उलटली (Boat Capsized). या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला असून 3 शेतकरी बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. कटिहारच्या केवला घाटातील काही शेतकरी रविवारी सकाळी बोटीने हातकोला येथील डायरा येथे शेती करण्यासाठी जात होते. यावेळी त्यांची बोट अचानक नदीत उलटली.

प्राप्त माहितीनुसार, बोटीवर 12 शेतकरी होते. त्यापैकी तीन शेतकरी बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच पोलीस एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप मृतांचा आकडा प्रशासनाने जाहीर केलेला नाही. (हेही वाचा -Fishing boat capsized in Sindhudurg: मालवणमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेली बोट समुद्रात उलटली; 3 जणांचा मृत्यू)

या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेपत्ता झाल्याची किंवा मृत्यूची अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण, बोटीत 11 ते 12 जण असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यात पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Boat Capsized During Andheri Cha Raja Immersion: वर्सोवा बीचवर अंधेरीचा राजा विसर्जनावेळी बोट उलटली; दोन डझनहून अधिक लोक पडले समुद्रात (Watch Video))

बोट दुर्घटनेनंतर एसडीओसह सर्व अधिकारी केवला घाटाजवळील हटकोलजवळ दियारा येथे पोहोचले असून एसडीआरएफच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मनिहरीचे आमदार मनोहर प्रसाद यांनीही घटनास्थळी पोहोचून चौकशीची मागणी केली. उत्तरवाहिनी केवला घाटाजवळ बोट नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी झाल्याचे त्यांनी सांगितले.