Bank Holidays

आरबीआय (RBI) कडून 31 मार्च दिवशी जाहीर करण्यात आलेली सुट्टी आता रद्द करण्यात आली आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी अहवाल सादर करण्यासाठी ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे. 31 मार्च दिवशी यंदा रमजान ईद (Ramadan Eid) असल्याने हिमाचल प्रदेश, मिझोराम वगळता अन्य भागात सुट्टी जाहीर करण्यात आली होती मात्र आता ती रद्द करण्यात आली आहे.

31  मार्च दिवशी सरकारचे आर्थिक वर्ष संपले आहे, याचा अर्थ सरकारी महसूल, पेमेंट आणि सेटलमेंटशी संबंधित सर्व व्यवहार नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.

31 मार्च दिवशी कोणत्या सुविधा सुरू राहणार?

  • सरकारी कर भरणे (आयकर, जीएसटी, सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क)
  • पेन्शन वितरण आणि सरकारी अनुदान
  • सरकारी वेतन आणि भत्ते भरणे
  • सरकारी योजनांशी संबंधित सार्वजनिक व्यवहार

31 मार्च रोजी बँका खुल्या राहतील, तर बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वार्षिक खाते बंद करण्यासाठी त्या 1 एप्रिल (मंगळवार) बंद राहतील. मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमधील बँका खुल्या राहतील. नक्की वाचा: RBI To Launch New Banking Domain: आता बँक खात्यात पैशांची फसवणूक टाळणे होणार सोपे; RBI एप्रिलपासून लागू करणार नवीन नियम .

सरकारशी संबंधित व्यवहारांसाठी (जसे की कर भरणे आणि निधी हस्तांतरण) ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग सेवा उपलब्ध राहतील अशी अपेक्षा आहे. कोणत्याही विशिष्ट सूचनांसाठी ग्राहकांनी त्यांच्या बँकांशी संपर्क साधावा.