एकीकडे 'वर्क फ्रॉम होम' की 'वर्क फ्रॉम ऑफिस'? याबाबत वाद सुरू आहे, तर दुसरीकडे कर्मचारी त्यांचे काम आणि वैयक्तिक आयुष्य यांची सांगड घालता घालता अक्षरशः वैतागले आहेत. अशात बेंगळूरूमध्ये चक्क कार चालवताना लॅपटॉपवर काम करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. होय, ऐकायला चित्रित वाटतंय मात्र हे खरे आहे. ही महिला ड्रायव्हिंग करताना लॅपटॉपवर काम करत होती. हे कृत्य तिला महागात पडले आहे. यामुळे तिला दंड आकारण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तिला 'घरातून काम करा, गाडीतून नाही' असा सल्लाही दिला. आरटी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा कार चालवताना लॅपटॉप वापरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सकाळी तिला ओव्हरस्पीडिंग आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याबद्दल 1,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
काही महिन्यांपूर्वीदेखील, बेंगळुरूमधून असेच व्हिडिओ समोर आले होते, ज्यामध्ये एक व्यक्ती सिनेमा हॉलमध्ये लॅपटॉपवर काम करत असल्याचे दिसत होते. तर अजून एका व्हिडीओमध्ये दुसरी व्यक्ती स्कूटर चालवताना लॅपटॉप वापरत असल्याचे दिसून आले होते. (हेही वाचा: Texas Shocker: टेक्सासमध्ये कारवरील बर्फ पुसण्यासाठी व्यक्तीने वायपर म्हणून केला 3 महिन्यांच्या बाळाचा वापर; पोलिसांकडून चौकशी सुरु)
Bengaluru Work From Car:
बेंगलुरु में गाड़ी चलाते समय लैपटॉप पर काम करने पर महिला पर जुर्माना लगाया गया। पुलिस ने उसे सलाह दी कि 'कार से नहीं, घर से काम करो'।
आरटी नगर पुलिस स्टेशन की सीमा में गाड़ी चलाते समय लैपटॉप का इस्तेमाल करने वाली महिला का एक वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुआ। अधिकारियों के अनुसार,… pic.twitter.com/4YJOZPMxfR
— AajTak (@aajtak) February 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)