Maha Kumbh 2025 फोटो सौजन्य - Edited image)

Maha Kumbh 2025 Conclude Date: प्रयागराज (Prayagraj) येथे बुधवारी माघ पौर्णिमेनिमित्त (Magh Pournima 2025) महाकुंभस्नानासाठी मोठी गर्दी जमली होती. लाखो लोकांनी माघ पौर्णिमेनिमित्त त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. मौनी अमावस्येच्या अमृतस्नानानंतर, नागा साधू आपापल्या ठिकाणी गेले आहेत आणि आता प्रयागराजमधील हा महाकुंभ हळूहळू त्याच्या समारोपाकडे वाटचाल करत आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, माघ पौर्णिमेला रात्री 8 वाजेपर्यंत एकूण 2.04 लाख लोकांनी स्नान केले. तर 12 फेब्रुवारीपर्यंत एकूण 48.29 कोटी लोकांनी महाकुंभात (Mahakumbh 2025) स्नान केले. त्यामुळे तुमच्यातील अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, 2025 चा महाकुंभ मेळा कधी संपेल?

महाकुंभाचे पुढील मोठे स्नान कधी आहे?

महाकुंभमेळा 2025 पौष पौर्णिमेला, 13 जानेवारी रोजी सुरू झाला. त्याच दिवसापासून कल्पवासींनी त्यांचे कल्पवास देखील सुरू केले, जे काल माघ पौर्णिमेच्या स्नानानंतर संपले. या महाकुंभात 10 लाखांहून अधिक कल्पवासींनी कल्पवास केला आहे. त्याच वेळी, महाकुंभाचे पुढील मोठे स्नान महाशिवरात्रीच्या उत्सवात येत आहे. या दिवशीही कोट्यवधी भाविक स्नान करतील अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा - Next Kumbh Mela: वर्षे 2025 नंतरचा पुढील कुंभमेळा कधी व कुठे होणार? जाणून घ्या या धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सवाच्या आगामी तारखा व महत्व)

महाकुंभमेळा कधी संपणार?

पौष पौर्णिमेला 13 जानेवारी रोजी सुरू झालेला महाकुंभ 26 फेब्रुवारी रोजी संपेल. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. तसेच, ईशान संहितेनुसार, या दिवशी भगवान शिव यांनी निराकारातून मूर्त रूप धारण केले. या दिवसालाचं महाशिवरात्री म्हणून ओळखले जाते. या दिवशी देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असेल. तसेच, महाकुंभाच्या मोठ्या स्नानासाठी कोट्यवधी लोक संगम तीरावर येतील. (हेही वाचा: Maha Kumbh Mela 2025: मौनी अमावस्या अमृतस्नानाला त्रिवेणी संगमात 5 कोटी भाविकांनी केले पवित्र स्नान, एकूण भाविकांनी 20 कोटींचा टप्पा ओलांडला)

महाशिवरात्रीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.08 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 08.54 वाजता संपेल. त्यामुळे येत्या महाशिवरात्रीला महाकुंभ मेळ्याची समाप्ती होईल.