Next Kumbh Mela: वर्षे 2025 नंतरचा पुढील कुंभमेळा कधी व कुठे होणार? जाणून घ्या या धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सवाच्या आगामी तारखा व महत्व
देव आणि दानवांमध्ये अमृतकलशासाठी झालेल्या संघर्षात अमृताचे काही थेंब ज्या चार ठिकाणी पडल्याचे मानले जाते, तिथे कुंभमेळा आयोजित केला जातो. महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सव मानला जातो.
‘महाकुंभ मेळा’ next kumbh melaहा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक मेळा आहे. हा दर 12 वर्षांनी चार प्रमुख ठिकाणी- प्रयागराज (अलाहाबाद), हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक इथल्या पवित्र नद्यांच्या किनारी आयोजित केला जातो. कुंभमेळ्यात स्नान केल्याने पापक्षालन होते आणि मोक्षप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. या मेळ्यात साधू, संत, महंत आणि कोट्यावधी भाविक येथे एकत्र येतात. यावेळी विविध धार्मिक विधी, प्रवचने आणि योग शिबिरे आयोजित केली जातात. पूर्ण कुंभ मेळा दर 12 वर्षांनी, अर्धकुंभ मेळा दर 6 वर्षांनी, तर कुंभ मेळा प्रत्येक 3 वर्षांनी भरतो. सध्या प्रयागराज इथे महाकुंभ मेळा सुरु आहे. कुंभमेळा हे राक्षसांवर देवांच्या विजयाचे प्रतीक आहे.
महाकुंभ 2025 चे महत्व-
महाकुंभ 2025 विशेष आहे कारण तो 144 वर्षांनंतर होत आहे. दर 12 वर्षांनी एक कुंभमेळा आयोजित केला जातो, परंतु 12 कुंभमेळ्यांनंतर महाकुंभ आयोजित केला जातो. यंदाचा प्रयागराज इथला हा महाकुंभमेळा आहे. यावेळी सूर्य, चंद्र, शनि आणि गुरु या ग्रहांचा दुर्मिळ आणि शुभ संयोग होत आहे. कुंभमेळा युगानुयुगे आयोजित केला जात असल्याने आणि त्याच्या प्रारंभाची तारीख अज्ञात आहे, त्यामुळे अचूक 144 वर्षांचे चक्र मोजणे निश्चित नाही. मात्र, खगोलशास्त्रीय गणनेनुसार 2025 चा महाकुंभ मेळा अद्वितीय आहे, कारण त्याचे नक्षत्र संरेखन दर 144 वर्षांनी एकदा पाहिले जाते.
पुढील कुंभमेळ्याची ठिकाणी-
आता प्रश्न पडतो की, प्रयागराजनंतर पुढे कुठे व कधी कुंभमेळा भरणार आहे. प्रत्येक कुंभमेळ्याचे ठिकाण बृहस्पति (गुरु), सूर्य आणि चंद्र यांच्या ज्योतिषीय संरेखनाने ठरवले जाते. तर, आगामी महाकुंभमेळ्यांची यादी स्थानानुसार-
2025- प्रयागराज (महा कुंभमेळा)
2027- नाशिक (पूर्ण कुंभमेळा)
2027- हरिद्वार (अर्ध कुंभमेळा)
2028- उज्जैन (पूर्ण कुंभमेळा)
2033- हरिद्वार (पूर्ण कुंभमेळा)
ज्योतिषशास्त्रानुसार प्रयागराजमध्ये पुढील महाकुंभ 2169 मध्ये होणार आहे. 2030 मध्ये प्रयागराज येथे अर्धकुंभ आयोजित केला जाईल. (हेही वाचा: Maha Kumbh Mela 2025: मौनी अमावस्या अमृतस्नानाला त्रिवेणी संगमात 5 कोटी भाविकांनी केले पवित्र स्नान, एकूण भाविकांनी 20 कोटींचा टप्पा ओलांडला)
धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सव-
दरम्यान, देव आणि दानवांमध्ये अमृतकलशासाठी झालेल्या संघर्षात अमृताचे काही थेंब ज्या चार ठिकाणी पडल्याचे मानले जाते, तिथे कुंभमेळा आयोजित केला जातो. महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सव मानला जातो. हा उत्सव श्रद्धा, अध्यात्म, आणि भारतीय संस्कृतीचा भव्य संगम आहे. युनेस्कोनेही कुंभ मेळ्याला ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ म्हणून मान्यता दिली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 02:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

