Credit-(X,@firstbiharnews)

VIDEO: मुझफ्फरपूर जिल्ह्यात जुन्या वैमनस्यातून जोरदार भांडण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 12 जणांनी मिळून जवळपास 6 घरांवर बॉम्ब फेकले,  मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मणियारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागी विशनपूर माधो गावात ही बॉम्ब फेक करण्यात आली आहे. या घटनेत एका घराच्या मालकाने दरवाजा उघडला आणि बॉम्ब फेककरणाऱ्यांनी त्याचावर गोळीबार केला, दरम्यान, वृद्धांना गोळी लागली नसून ते  बचावले आहेत. आरोपींनी परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली. या घटनेनंतर गावातील लोक प्रचंड घाबरले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @firstbiharnews हँडलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर शेअर केला आहे.

वैमनस्यातून बॉम्बफेक

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दरम्यान, गावातील काही गुंड २० लाखांची खंडणी मागत असल्याची माहिती पीडित ेच्या कुटुंबियांनी दिली आहे. याच जुन्या भांडणातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ अनिमेषचंद्र ज्ञानी आणि मणियारी पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पुरावे गोळा करण्यासाठी एफएसएल पथकालाही पाचारण केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्या आधारे पोलिस आरोपींची ओळख पटविण्याचे काम करत आहेत.