Viral Video: रस्त्याच्या मधोमध चालत्या कँटरला लागली भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुजफ्फरनगरच्या न्यू मंडी पोलीस स्टेशन परिसरातील जनसठ रोडवर ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना घडतात, अशा अनेक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक घटना मुजफ्फरनगर येथे घडली असून एका ट्रकला अचानक भीषण आग लागली, घटनेचा व्हिडिओ @bstvlive हँडलने शेअर केला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अवघ्या काही मिनिटांत आगीने भीषण रूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती की, ट्रक चालक आणि वाहकाला जीव वाचवण्यासाठी गाडीतून उडी मारावी लागली. हे आयशर कँटर होते

Viral Video: रस्त्याच्या मधोमध चालत्या कँटरला लागली भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Viral Video

Viral Video: मुजफ्फरनगरच्या न्यू मंडी पोलीस स्टेशन परिसरातील जनसठ रोडवर ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे.  रस्त्यावर वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना घडतात, अशा अनेक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक घटना मुजफ्फरनगर येथे घडली असून एका ट्रकला अचानक भीषण आग लागली, घटनेचा व्हिडिओ @bstvlive हँडलने शेअर केला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अवघ्या काही मिनिटांत आगीने भीषण रूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती की, ट्रक चालक आणि वाहकाला जीव वाचवण्यासाठी गाडीतून उडी मारावी लागली. हे आयशर कँटर होते, जे रद्दीने भरलेले होते. गाडी पानिपत खटीमा येथे पोहोचताच अचानक आग लागली. यामुळे रस्त्यावर गोंधळ उडाला आणि काही क्षणातच गाडी जळून खाक झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. हेही वाचा: MP Road Accident: मध्य प्रदेशात कार आणि खासगी बसच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 9 जण जखमी

येथे पाहा, घटनेचा व्हायरल व्हिडीओ 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 13, 2025 07:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).