Mumbai Air Pollution: मुंबई मध्ये पेट्रोल, डिझेल कार वर बंदी येणार? वाढत्या वायुप्रदुषणावर तोडगा काढण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन

AQI 100 पेक्षा जास्त असल्यास हवेची गुणवत्ता खराब मानली जाते. मुंबईतील वायू प्रदूषण पातळी (AQI) 193 PM2.5 आणि 159 PM10 आज नोंदवण्यात आली आहे.

Mumbai Air Pollution: मुंबई मध्ये पेट्रोल, डिझेल कार वर बंदी येणार? वाढत्या वायुप्रदुषणावर तोडगा काढण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन
Car and Air Pollution | Pixabay.com

मुंबई (Mumbai) मध्ये वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यावर बंदी (Petrol, Diesel Cars To Be Banned) घालण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून येत्या 3 महिन्यात ही समिती आपला अहवाल देणार असल्याचं समोर आलं आहे.

22 जानेवारीच्या आदेशानुसार, निवृत्त आयएएस अधिकारी सुधीर श्रीवास्तव या कमिटीचं नेत्तृत्त्व करणार आहेत. या समितीमध्ये ट्रान्सपोर्ट कमिशनर , जॉईंट पोलिस कमिशनर ट्राफिक, महानगर गॅस लिमिटेड चे एमडी, पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफ्रॅक्चर्स चे अध्यक्ष आणि जॉईंट ट्रान्सपोर्टचे कमिशर यांचा समावेश आहे.

जारी आदेशानुसार, या समितीला अभ्यासासाठी पॅनेलमध्ये विविध तज्ज्ञांचाही समावेश करता येणार आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मध्ये ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांचाही समावेश होतो. याचा अर्थ या भागातही डिझेल-पेट्रोल वाहनांवर बंदी घालण्याबाबतही अभ्यास केला जाणार आहे.

मुंबईची हवा प्रदुषित

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबई 512 व्या क्रमांकावर आहे. 28 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील वायू प्रदूषण पातळी (AQI) 193 PM2.5 आणि 159 PM10 होती. तर, O3 AQI 39 ​​आणि NO2 AQI 21 होता. AQI 100 पेक्षा जास्त असल्यास हवेची गुणवत्ता खराब मानली जाते. Mumbai Pollution: मुंबईत जीआरएपी-4 लागू केल्यानंतर बीएमसीकडून कारवाईचे आदेश, प्रदूषण रोखण्यासाठी बोरिवली पूर्व-भायखळा येथील 78 बांधकाम साइट्स बंद.  

मुंबई मधील वाहन संख्या

ऑगस्ट 2024 मध्ये मुंबईत वाहनांची संख्या 48 लाखांहून अधिक होती. त्यापैकी 14 लाख खासगी कार आणि 29 लाख दुचाकी होत्या. म्हणजेच प्रत्येक किलोमीटरच्या रस्त्यावर 2,300 वाहने आहेत. त्याच वेळी, 2021-2022 मध्ये 35 लाखांहून अधिक खाजगी आणि व्यावसायिक वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 10 लाखांहून अधिक चारचाकी आणि 25 लाखांहून अधिक दुचाकींचा समावेश आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).