Kapil Sharma, Ranveer Allahbadia (Photo Credits: Instagram)

Kapil Sharma's Comedy Viral Video: रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahabadia) च्या वादग्रस्त विधानानंतर सोशल मीडियावर त्याच्या नावाची बरीच चर्चा होत आहे. युट्यूबर आणि उद्योगपती रणवीरने या प्रकरणावर माफी मागितली आहे, परंतु तरी ट्रोलिंग थांबताना दिसत नाही. विनोदी कलाकारांपासून ते लेखकांपर्यंत, सर्वजण इंडियाज गॉट लॅटेंटच्या व्हिडिओ क्लिपला लज्जास्पद म्हणत आहेत. दरम्यान, प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) चा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. रणवीरने पालकांवर अपमानास्पद टिप्पण्या करून अश्लीलता पसरवल्याबद्दल वापरकर्ते त्याच्यावर टीका करत आहेत.

दरम्यान, आता कपिल शर्माचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो त्याच्या पालकांवर विनोद करताना दिसत आहे. हा विनोद 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' च्या काळातील आहे, जेव्हा कपिल शर्मा भारतातील लोकांच्या दोन आवडत्या गोष्टींबद्दल बोलत होता. यात त्याने क्रिकेटसंदर्भात बोलताना पालकांवर विनोदी टिप्पण्णी केली होती. (हेही वाचा - Rajpal Yadav on Ranveer Allahbadia : रणवीर अलाबादियाच्या वादग्रस्त विधानावर राजपाल यादव संतापला; म्हणाला, ‘आई-वडीलांनाही नाहीत सोडत’ (Watch Video)

कपिल शर्माचा जूना व्हायरल व्हिडिओ - 

19 फेब्रुवारी 2023 रोजी टीव्हीवर प्रसारित झालेल्या भागात कपिल म्हणाला आहे की, “काहींना पाहण्याची खूप आवड असते, ते सामना पाहण्यासाठी पहाटे 2 वाजता उठतात, सामना 4 वाजता सुरू व्हायचा असतो, नंतर ते त्यांच्या पालकांचा कबड्डी पाहिल्यानंतर झोपी जातात. कपिलने हे सांगितल्यानंतर, अर्चना पूरण सिंग आणि बाकीचे प्रेक्षक हसतात. तथापि, इंस्टाग्रामवर फक्त एवढीच क्लिप व्हायरल झाली आहे. तर याचा एक संपूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर आहे, ज्यामध्ये कपिल त्याच्या विनोदाचे स्पष्टीकरण देताना म्हणतो की, याचा अर्थ पालक भांडण करतात.