Poonam Gupta Gets Married at Rashtrapati Bhavan: बुधवार, 12 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रपती भवनासाठी एक संस्मरणीय दिवस होता. कारण या दिवशी राष्ट्रपती भवनमध्ये एक विवाहसोहळा पार पडला. काल या ठिकाणी सीआरपीएफ असिस्टंट कमांडंट पूनम गुप्ता आणि सीआरपीएफ अधिकारी अवनीश सिंग यांचे लग्न झाले. पूनमच्या कामाने आणि समर्पणाने प्रभावित होऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनमध्ये या लग्नासाठी परवानगी दिली होती. काल या जोडप्याला कुटुंबासह राष्ट्रपतींचे आशीर्वाद मिळाले. पूनम गुप्ता आणि अवनीश कुमार यांचा विवाह राष्ट्रपती भवनाच्या मदर तेरेसा कॉम्प्लेक्समध्ये झाला. हे ठिकाण सहसा जगभरातील राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करण्यासाठी ओळखले जाते. मात्र, यावेळी येथे एक वैयक्तिक आनंदाचा प्रसंग पार पडला. नर्मदापुरमचे खासदार दर्शन चौधरी हे देखील पूनम गुप्ता हिच्या लग्नाला उपस्थित होते.
पूनम गुप्ता ही सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट आहेत आणि सध्या ती राष्ट्रपती भवनात पीएसओ म्हणून तैनात आहेत. पीएसओ म्हणजे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी. म्हणजेच ती राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. याआधी 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महिला पथकाचे नेतृत्व करून तिने आपली क्षमता सिद्ध केली होती. (हेही वाचा: Jeet Adani-Diva Shah Wedding: जीत अदाणींच्या लग्नाच्या निमित्ताने Gautam Adani यांनी सामाजिक कार्यासाठी केले 10,000 कोटींचे दान)
Poonam Gupta Gets Married at Rashtrapati Bhavan:
CRPF अफसर पूनम गुप्ता ने राष्ट्रपति भवन में लिए फेरे, प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू भी पहुंचीं
सीआरपीएफ अधिकारी पूनम गुप्ता की शादी राष्ट्रपति भवन में हो गई है। यह ऐतिहासिक शादी 12 फरवरी की रात हुई है। पूनम गुप्ता अभी राष्ट्रपति की पीएसओ हैं, राष्ट्रपति की विशेष अनुमति से उनकी शादी… pic.twitter.com/DrOE8OrOGY
— NBT Hindi News (@NavbharatTimes) February 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)