Jeet Adani, Diva Shah | X @ANI

अदाणी समूहचे चेअरमन गौतम अदाणी (Adani Group chairman Gautam Adani) यांचा मुलाचा आज अहमदाबाद मध्ये विवाहसोहळा पार पडला आहे. गौतम अदाणींच्या मुलाचा विवाहसोहळा शाही होणार अशा अफवा सुरू असताना त्यांनी अत्यंत खाजगी स्वरूपात हा विवाह केल्याची माहिती दिली आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी जीत अदाणी (Jeet Adani) आणि दीवा शाह (Diva Shah) यांच्या विवाहाचे काही क्षण शेअर केले आहेत. दरम्यान या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी दहा हजार कोटींचा दानधर्म केल्याची माहिती समोर आली आहे.

अदाणी कुटुंबाने जीतच्या लग्नानिमित्त दान केलेली रक्कम देशात हेल्थकेअर, शिक्षण आणि स्किल डेव्हल्पमेंट वर खर्च केली जाईल असं सांगण्यात आले आहे. अदाणी समुहाचा प्रयत्न आहे की समाजातील सर्व घटकांना परवडणारी जागतिक दर्जाची रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर आहे. याव्यतिरिक्त, परवडणाऱ्या उच्च श्रेणीच्या K-12 शाळांचे नेटवर्क आणि खात्रीशीर रोजगारक्षमतेसह श्रेणीसुधारित जागतिक कौशल्य अकादमींमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील. Jeet Adani-Diva Shah Wedding: जीत अदाणी-दिवा शाह अडकले विवाहबंधनात; गौतम अदाणींनी शेअर केला फोटो .

जीत अदाणींच्या लग्नाच्या निमित्ताने दानधर्म

दरम्यान गौतम अदाणी यांनी जीत-दीवाचं लग्न पारंपारिक स्वरूपात संपन्न झाले आहे. हा खाजगी विवाहसोहळा असल्याने अनेक हित चिंतकांना बोलवता आलं नाही पण प्रेम आणि आशिर्वाद कायम रहावा यासाठी त्यांनी आवाहन करत लग्नाचा पहिला फोटो सोशल मीडीयात शेअर केला आहे.

गौतम अदाणी यांचा धाकटा मुलगा जीत अदाणीने पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. 2019 मध्ये तो अदानी ग्रुपमध्ये सामील झाला. स्ट्रॅटेजिक फायनान्स, कॅपिटल मार्केट्स आणि रिस्क अँड गव्हर्नन्स पॉलिसी तो पाहतो. ग्रुप सीएफओ म्हणून त्याने आपली कारकीर्द सुरू केली. जीत अदानी विमानतळ व्यवसायात तसेच अदानी डिजिटल लॅबचे नेतृत्व करत आहेत.