HC on Marriage Between Hindus: 'दोन हिंदूंमधील विवाह एक पवित्र बंधन, एका वर्षात संपुष्टात येऊ शकत नाही'; Allahabad High Court ने फेटाळली जोडप्याची घटस्फोटाची याचिका
उच्च न्यायालयाने म्हटले की, या ठिकाणी कलम 14 अंतर्गत कोणतीही ‘अपवादात्मक परिस्थिती’ नाही, ज्यामुळे जोडप्याला एका वर्षाच्या आत घटस्फोटासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, न्यायालयाने त्यांना एक वर्षानंतर पुन्हा अर्ज करण्याचा पर्याय दिला.
‘हिंदू विवाह’ हा पवित्र संबंध मानला जातो आणि असाधारण त्रास किंवा असाधारण अनैतिकता असल्याशिवाय परस्पर मतभेदाच्या कारणास्तव, तो एका वर्षाच्या आत संपुष्टात येऊ शकत नाही. पती-पत्नीची याचिका फेटाळताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही महत्त्वाची टिपण्णी केली. कौटुंबिक न्यायालयाने विवाह रद्द करण्यास नकार दिल्याने या जोडप्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावत ही टिप्पणी केली. न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा आणि डोनाडी रमेश यांच्या खंडपीठाने हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 14 चा हवाला देऊन सांगितले की, असाधारण त्रास किंवा असाधारण अनैतिकता असल्याशिवाय विवाहाच्या एका वर्षाच्या आत घटस्फोटाची याचिका दाखल केली जाऊ शकत नाही. तसेच केवळ पक्षांमधील सामान्य परस्पर मतभेदाच्या आधारावर, जोडप्याला एका वर्षाच्या आत घटस्फोटाची याचिका दाखल करण्याची सूट दिली जाऊ शकत नाही.
उच्च न्यायालयाने म्हटले की, या ठिकाणी कलम 14 अंतर्गत कोणतीही ‘अपवादात्मक परिस्थिती’ नाही ज्यामुळे जोडप्याला एका वर्षाच्या आत घटस्फोटासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, न्यायालयाने त्यांना एक वर्षानंतर पुन्हा अर्ज करण्याचा पर्याय दिला.
HC on Marriage Between Hindus:
If no 'exceptional hardship', 2 Hindus can't dissolve marriage within a year: Allahabad High Courthttps://t.co/BCJbirEcUS
— IndiaToday (@IndiaToday) January 29, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2025 07:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

