Madhya Pradesh

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये गुरुवारी सकाळी 8 वाजता स्कूल बसची वाट पाहणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुरड्याचे दोन जणांनी दिवसाढवळ्या अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना सकाळी मोरार परिसरात घडली होती. ग्वाल्हेर झोनचे पोलीस महानिरीक्षक अरविंद सक्सेना यांनी पीटीआयला सांगितले की, "दोन जण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी आईच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यानंतर दोन्ही आरोपी मुलाला मोटारसायकलवरून घेऊन गेले. नी मुलाचा शोध सुरू केला असून  मुलाची माहिती देणाऱ्यास ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

मुलाचे वडील हे चिनी व्यापारी असल्याचे समोर आले आहे. मुलगा व्यापाऱ्याचा मुलगा आहे. अपहरणाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, अपहरणाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस संपूर्ण घटनेची कसून चौकशी करत आहेत.

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एक्स हँडलवर पोस्ट करत लिहिले कि,  ग्वाल्हेरमध्ये शाळेत जाणाऱ्या 6 वर्षांच्या मुलाचे दिवसाढवळ्या अपहरण केल्याची घटना अत्यंत दु:खद आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेतील त्रुटींचे हे अत्यंत धोकादायक उदाहरण आहे, मला आशा आहे की, यासंदर्भात त्वरित आणि जलद कारवाई केली जाईल आणि मुलाला त्याच्या पालकांकडे सुखरूप आणले जाईल.