Chandra Grahan 2020: जानेवारी महिन्यात या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण; तारीख, वेळ, कालावधी घ्या जाणून
Representational Image (Photo Credits: Pixabay)

Chandra Grahan (Lunar Eclipse) 2020 Date: नववर्ष 2020 मधील पहिले चंद्रग्रहण (First Chandra Grahan in 2020) यंदा 10 जानेवारी या दिवशी लागणार आहे. चंद्र ग्रहण (Lunar Eclipse) रात्री 10 वाजून 39 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, रात्री 2 वाजून 20 मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे. त्यामुळे साधारण एकूण 4 तास इतकाय या चंद्र ग्रहणाचा अवधी (Chandra Grahan Period) असणार आहे. हे ग्रहण भारत, यूरोप, अफ्रीका, अशिया, आणि ऑस्ट्रेलिया आदी देश आणि या खंडातील काही भागांमध्ये दिसणार आहे. सन 2020 मध्ये एकूण 6 चंद्र गहण असणार आहेत. त्यात 4 चंद्र ग्रहण आणि 2 सूर्य ग्रहण असतील.

हिंदू धर्मात चंद्रग्रहण लागण्यामागे राहु, केतु असल्याचे सांगतात. एका पौराणिक कथेचा दाखला घ्यायचे तर, समुद्र मंथनादरम्यान देव देवता आणि राक्षस यांच्यात अमृत मिळवण्यावरुन घनघोर युद्ध झाले. या वेळी अमृत पिण्यासाठी भगवान विष्णु यांनी मोहिनी नावाच्या सुंदर कन्येचे रुप घेतले. तसेच, सर्वांना हे अमृत योग्य पद्धतीने समसमान वाटण्यासाठी सर्वांचे मन वळवले. जेव्हा मोहिनी रुपात भगवान विष्णु हे अमृत देण्यासाठी देवतांपर्यंत पोहोचले तेव्हा राहु नावाचा राक्षसही देवांच्या रांगेत जाऊन बसला. ज्यामुळे त्यालाही अमृत मिळेल.

मोहिनी रुपी विष्णुच्या हस्ते अमृत पिऊन हा राक्षस जेव्हा मागे सरला तेव्हा या घटनेची माहिती पहिल्यांदा सूर्य आणि चंद्र या दोघांना लागली. या राक्षसाबाबत सूर्य आणि चंद्राने भगवान विष्णुला सांगितले. तेव्हा भगवान विष्णु यांनी आपल्या सूदर्शन चक्राने राक्षसाचे शीर धडावेगळे करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतू, अमृत पिल्यामुळे हा राक्षस ठार होऊ शकला नाही. तेव्हापासून या राक्षसाचे डोके आणि धड हे अनुक्रमे राहु आणि केतु या नावाने ओळखले जाऊ लागले. या घटनेमुळेच सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण लागत असते असे पुराणकथा सांगते. (हेही वाचा, Chandra Grahan 2019: ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी?)

दरम्यान, सूर्य आणि चंद्र ग्रहणाचे वैज्ञानिक कारण सांगायचे तर, पृथ्वी सूर्य परिक्रमा करते. तर चंद्र पृथ्वीची परिक्रमा करतो. म्हणजेच पृथ्वी सूर्याभोवती तर चद्र पृथ्वीभोवती फिरतो. ही प्रक्रिया घडत असताना अनेक वेळा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते. या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र ग्रहण लागते. तर, कधी कधी चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये येतो. तेव्हा, चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्य ग्रहण लागते. प्रामुख्याने चंद्र ग्रहण हे पौर्णिमेला तर, सूर्य ग्रहण हे आमावस्येला लागते.