Aadhar Card : सावधान! तुमच्या आधार कार्ड होवू शकतो गैरवापर; जाणून घ्या महत्वाच्या टीप्स
Aadhaar Card (Photo Credits: PTI)

आजकाल सर्व गोष्टी आधार कार्डशी लिंक गरजेच झालं आहे. जर एखाद्याला  तुमच्याआधार क्रमांकाबद्दल माहिती मिळाली तर तो त्याचा गैरवापर देखील करू शकतो. हे  टाळण्यासाठी व्हर्चुअल आयडी (Virtual ID) हा पर्याय आहे. हा आयडी देखील 16 क्रमांकाचा असतो. हा आयडी बँकिंगपासून सर्व प्रकारच्या सुविधांसाठी वैध मानला जातो. हा आयडी तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे हवा तसा बदलू शकता. 2010 पासून भारतात आधार कार्ड (Aadhar Card) या नव्या ओळखपत्राला कामकाजात सुरुवात झाली. आज ते विविध कारणांसाठी वापरले जाते.  शाळेत प्रवेश मिळवण्यापासून, शिष्यवृत्ती, नोकरी, व्यवसाय, सरकारी योजनांच्या लाभापर्यत विविध बाबातीत आधार कार्डचा वापर केला जातो.आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे.

 

आधार कार्डची प्रत्येक भारतीय नागरिकास एक विशेष उपयुक्तता आहे. आज भारतातील जवळपास सर्व लोकांकडे त्यांचे आधार कार्ड आहे. आधार कार्ड प्रत्येकाकडे असणं बंधनकारक आहे.आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयाचं हक्काचं ओळखपत्र असुन त्याची वैधता कधीही संपत नाही. आधार कार्डचं नुतणीकरण करण्याची काहीही गरज नाही. आधार कार्ड धारकाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तो संपूर्ण आयुष्यभर आधारकार्ड विना नुतणीकरण सहजरीत्या वापरु शकतो.  आधारकार्डची  वैधता ही त्या आधार कार्ड धारक व्यक्तीच्या मृत्यूबरोबर संपते. आधार कार्ड धारकाच्या मृत्यूनंतरच आधार कार्ड अवैध होतं. (हे ही वाचा:-PAN-Aadhaar Linking: जून महिन्याच्या अखेरीपर्यंत आधार-पॅन लिंकिंगचं काम करा पूर्ण अन्यथा भरावा लागेल दुप्पट दंड!)

 

पण व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याचं आधार कार्ड व्यवस्थित सांभाळून ठेवणं गरजेचं असतं. व्यक्तिचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे आधारकार्ड निष्क्रिय केले जात नाही. कारण अशी कोणती पद्धत अस्तित्वात नाही. त्याचबरोबर मृत व्यक्तिचा आधार नंबर रद्द करण्याची  व्यवस्था सरकारने केलेली नाही. किंवा UIDAI कडून सांगण्यात आलेली नाही. आधार एक वेगळा ओळख क्रमांक आहे. मृत्यूनंतरही हा नंबर कायम असतो, कारण आधार क्रमांक कुठे अपडेट होत नाही. विशेष म्हणजे युआयडीएआय  प्राधिकरणाने अद्याप मृत्यू नोंदणीशी जोडलेले नाही. मृत्यूनंतर आधार कार्ड रद्द करण्याची कोणतीच व्यवस्था नाही.  म्हणून मृत व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर करणं सहज शक्य आहे तरी कुटुंबाने त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचं आधार कार्ड सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा गैरवापर होणार नाही.