Aadhaar-PAN Linking |(Photo Credits: File Photo)

सरकार कडून आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्डच्या (PAN Card) लिकिंगची कालमर्यादा 31 मार्च 2022 वरून आता 31 मार्च 2023 करण्यात आली आहे पण यासाठी किंमत मात्र मोजावी लागणार आहे. 1 एप्रिल 2022 पासून जर तुमचे आधार-पॅन लिंक (PAN-Aadhaar Linking) नसेल तर 500 रूपये फी 30 जून 2022 पर्यंत आकारण्यात आली होती. पण 1 जुलै 2022 पासून हीच फी दुप्पट म्हणजे 1000 रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे तुमचं आधार-पॅन अद्याप लिंक नसेल तर आर्थिक भुर्दंड कमी करण्यासाठी या महिन्याअखेरीस आधार- पॅन लिंक करा.

CBDT कडून जारी करण्यात आलेल्या नोटीसी मध्ये आता 1 जुलै पासून आधार-कार्ड लिकिंगचा दंड 500 वरून 1000 रूपये करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. हे देखील नक्की वाचा: Aadhaar-PAN Details Mismatch: तुमच्या आधार-पॅन कार्डवर नाव आणि जन्मतारीख वेगवेगळी आहे का? पहा, कसे कराल दुरुस्त? 

आधार-पॅन ऑनलाईन लिंक कसे कराल?

# ऑनलाईन आधार-पॅन लिंक करण्यासाठी इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल साईट incometaxindiaefiling.gov.in. ला भेट द्या.

# त्यातील 'Link Aadhaar' या सेक्शनवर क्लिक करा.

# तिथे पॅन नंबर, आधार क्रमांक आणि इतर महत्त्वाची माहिती भरा.

# एकदा सर्व माहिती भरुन झाल्यावर 'Link Aadhaar' वर क्लिक करुन सब्मिट बटण दाबा.

ऑनलाईन प्रमाणेच तुम्ही घरबसल्या SMS च्या माध्यमातूनही पॅन कार्ड - आधार कार्ड लिंक करू शकता. यासाठी तुम्हांला UIDAIPAN(12digit Aadhaar number) स्पेस (10 digit PAN Number) या फॉर्मेट मध्ये एक एसएमएस 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठायचा आहे.