भारताने पंजाब सेक्टरमध्ये पहिली S-400 हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केली आहे. तेथून ते चीनसह पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारचे हवाई हल्ले रोखू शकतील आणि देशाचे संरक्षण करण्यास सक्षम असतील. S-400 ची दुसरी रेजिमेंट पुढील वर्षी जून 2022 पर्यंत भारतात पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या सुरक्षेसाठी भारत आपल्या दोन्ही S-400 रेजिमेंट तैनात करू शकतो. S-400 ची गणना जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणालींमध्ये केली जाते. अनेक अर्थांनी S-400 अमेरिकेच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीपेक्षा चांगली आहे. याद्वारे क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, रॉकेट आणि अगदी ड्रोन हल्ल्यांपासून बचाव करता येतो. प्रत्येक रेजिमेंटमध्ये 8 लाँचर असतात. प्रत्येक लाँचरमध्ये 4 क्षेपणास्त्रे असतात. म्हणजेच, एक रेजिमेंट एकावेळी 32 क्षेपणास्त्रे डागू शकते.
Tweet
India deploys first S-400 air defence system in Punjab sector, to take care of aerial threats from both China, Pak
Read @ANI Story | https://t.co/LoMCWjb9OX#India #S400 pic.twitter.com/r73Jpng4Fg
— ANI Digital (@ani_digital) December 20, 2021
या प्रणालीचे कमांड सेंटर 600 किमी अंतरावरून हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्राचा किंवा विमानाचा मागोवा घेते, त्यानंतर ते 2 किमी ते 400 किमीपर्यंत नष्ट केले जाते. ही प्रणाली एका वेळी 80 लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकते आणि जेव्हा ते श्रेणीत येतात तेव्हा त्यांना नष्ट करू शकते. गरज भासल्यास ते ट्रकवर चढवून पुढे नेले तर ते अवघ्या 10 ते 15 मिनिटांत हल्ल्यासाठी तयार होते. जर ही यंत्रणा तैनात केली गेली तर सिग्नल मिळाल्यानंतर 3 मिनिटांत ती प्रत्युत्तरासाठी तयार होते. या यंत्रणेचा रडार जॅम होऊ शकत नाही. (हे ही वाचा पंतप्रधानांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन केली चर्चा, संरक्षण करारबाबत केला पाठपुरावा.)
'भारताने दाखवली ताकद आणि रशियाने खेळली मैत्री'
5 ऑक्टोबर 2018 रोजी, भारताने रशियासोबत S-400 च्या पाच रेजिमेंटसाठी 5.43 अब्ज किंवा सुमारे 39,000 कोटी रुपयांचा करार केला होता. चीन आणि पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना तोंड देण्यासाठी भारताला अशा प्रकारच्या हवाई संरक्षण प्रणालीची नितांत गरज आहे. चीनकडे केवळ चांगली लढाऊ विमानेच नाहीत, तर लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही मोठा साठा आहे.
भारतासह रशियासोबत झालेल्या या करारावर अमेरिकेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तेथील सरकारने CAATSA कायद्यांतर्गत भारतावर निर्बंध लादण्याची धमकीही दिली होती. मात्र भारताने आपल्या संरक्षण गरजांवरील निर्णयांवर कोणतेही नियंत्रण स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले होते.