IIT Mumbai (File Image)

QS World University Rankings जारी झाली आहे. यामध्ये टॉप 150 विद्यापीठांमध्ये IIT-Bombay चा समावेश झाला आहे. आयआयटी बॉम्बे चा 149 वा नंबर आहे. दरम्यान या यादीमध्ये दिल्ली विद्यापीठ 407 तर Anna University 427 व्या स्थानावर आहे. दरम्यान टॉप 100 मध्ये एकही भारतीय विद्यापीठ आपलं स्थान मिळवू शकलेलं नाही.

युनिव्हर्सिटी रॅकिंगच्या या 20 व्या एडिशन मध्ये 1500 इन्स्टिट्युटचा समावेश आहे. यामध्ये 104 ठिकाणांच्या विद्यापीठांमधून ही यादी करण्यात आली आहे. रँकिंगमध्ये संस्थांच्या मूल्यांकनामध्ये Employability आणि Sustainability शी संबंधित घटक समाविष्ट आहेत. नक्की वाचा: IIT-Bombay Darshan Solanki Suicide Case: आयआयटी मुंबई येथील दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी एसआयटीकडून आरोपपत्र दाखल .

Massachusetts Institute of Technology अर्थात MIT या यादीमध्ये मागील 12 वर्षांपासून अव्वल स्थानी आहे. यंदाही त्यांनी आपलं स्थान कायम ठेवलं आहे. दुसर्‍या क्रमांकावर University of Cambridge आहे आणि तिसर्‍या क्रमांकावर University of Oxford आहे. यंदा जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत तीन नवीन मेट्रिक्सच्या आधारे संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले , ज्यात Sustainability, Employment Outcomes आणि International Research Network यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 17.5 million अ‍ॅकॅडमीक पेपर्स आणि 240,000 तज्ञांच्या, नोकरी देणार्‍यांच्या मतांचा विचार करण्यात आला होता.

QS क्रमवारीत घसरलेल्या 13 भारतीय विद्यापीठांच्या क्रमवारी मध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. यामध्ये  IISc, बेंगळुरू, 155 वरून 225 वर, आणि IIT-मद्रास (285) 35 रँकने खाली आली आहे. यंदा टॉप 200 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 1 विद्यापीठ कमी आहे.

देशाचा Employment Outcomes Score जागतिक सरासरीपेक्षा एक तृतीयांश खाली आहे, जे नोकरीच्या गरजा आणि पदवीधरांच्या कौशल्यांमधील विसंगती कमी करण्याची तसेच शिकणाऱ्यांच्या नवीन पिढीसाठी अधिक संधी निर्माण करण्याची आवश्यकता दर्शवते. शिवाय, भारताचा 9.6 चा नवीन sustainability score हा जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे, जो उच्च शिक्षण व्यवस्थेतील शाश्वतता उपक्रमांना प्राधान्य देण्याची आणि मजबूत करण्याची आवश्यकता दर्शवितो.