NEET Exam Pattern 2020: मेडिकल कॉलेज प्रवेश मिळण्यासाठी जाणून घ्या 'नीट' परीक्षा फॅक्टर
NEET Exam | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

NEET Exam Pattern 2020: विविध सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं, केंद्रीय विद्यापीठ आणि डीम्ड यूनिवर्सिटींमध्ये प्रवेश मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते ती 'नीट' (National Eligibility cum Entrance Test) परीक्षा. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) या परीक्षेचे आयोजन करते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतात. इतकी मेहनत घेऊनही अनेकदा अनेक विद्यार्थ्यांना आपण ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ याची खात्री नसते. याचे प्रमुख कारण म्हणजे या परीक्षेत उत्तीर्ण होण्यापेक्षा सर्वाधिक गुण मिळवत वरच्या क्रमवारीत येणे महत्त्वाचे असते. महत्त्वाचे म्हणजे या परीक्षेच्या निकालाच्या माध्यमातूनच एमबीपीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो. त्यामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष नीट परीक्षा (NEET Exam) आणि तिच्या अभ्यासाकडे लागलेले असते. म्हणूनच आज आम्ही या परीक्षेबाबत काही महत्त्वाच्या टिप्स इथे देत आहोत. विद्यार्थ्यांना या टीप्स अभ्यास करताना फायदेशीर ठरु शकतात.

नीट परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रधम या परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम ध्यानात घ्यायला हवा. या अभ्यासक्रमाचे तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून विश्लेषण करुन घ्यायला हवे. त्यानंत काही सूत्र मनाशी पक्के करुन या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करायला हवी. विशिष्ट सूत्र डोक्यात ठेऊन काम केल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच, मनावरचा ताणही कमी होतो. दरम्यान, या परीक्षेचा अभ्यास करताना जीवशास्त्र, रसायणशास्त्र आणि भौतिकशास्त्र आदी विषयांवर विशेष लक्ष केंद्रीत करावे. (हेही वाचा, देशभरात पुढील वर्षी NEET ची परीक्षा 3 मे 2020 रोजी होणार, अर्ज प्रक्रिया 2 सप्टेंबर पासून सुरु)

या विषयांवर लक्ष अधिक केंद्रीत करा

फिजिक्स – मैकैनिज्म, ऑप्टिक्स, थर्मोडायनमिक्स, न्यूक्लियर फिजिक्स

केमेस्ट्री – मोल कॉन्सेप्ट, जनरल ऑर्गैनिक केमिस्ट्री, पिरीयोडिक टेबल, केमिकल बॉन्डिंग, कॉर्डिनेशन केमिस्ट्री, एफ ब्लॉक एलिमेंट्स

बायोलॉजी- इकोलॉजी अॅण्ड पर्यावरण, जेनेटिक्स, सेल बायोलॉजी, मोर्फोलॉजी, रिप्रोडेक्शन, प्लांट अॅण्ड एनीमल्स, बेसिस ऑफ बायोटेक्नोलॉजी.

NTA NEET 2019 Exam Pattern कसा असतो?

नीट परीक्षा पेपर ऑफलाइन आयोजित केली जाते. म्हणजे परीक्षार्थींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही पेनाने उत्तरपत्रिकेवर लिहावी लागतात. नीट परीक्षेत साधारण 180 प्रश्न विचालले जातात. या परीक्षेसाठी तीन तासांचा कालावधी असतो. एका प्रश्न चार पर्याय असे या प्रश्नोत्तरांचे स्वरुप असते. तसेच, गूणदान पद्धतीत एक चुकीचे उत्तर लिहिल्यास मिळालेल्या गुणांतील एक गूणांतून एकास एक या प्रमाणात गूणकपात केली जाते. संपूर्ण परीक्षा 720 गुणांची असते.