देशभरात पुढील वर्षी NEET ची परीक्षा 3 मे 2020 रोजी होणार, अर्ज प्रक्रिया 2 सप्टेंबर पासून सुरु
NEET Exam (Photo Credis- Facebook)

देशभरात पुढील वर्षी एमबीबीएस (MBBS) आणि एमडी (MD) अभ्यासक्रमाठी फार महत्वाची NEET परीक्षा 20 मे 2020 रोजी पार पडणार आहे. या परिक्षेची तारीख ही आज जाहीर करण्यात आली असून याबाबच एनटीए (NTA) यांनी अधिक माहिती दिली आहे.

तसेच NEET परिक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया 2 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. 31 डिसेंबर ही या परिक्षेच्या अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ntaneet.nic.in वर परिक्षेचा अर्ज भरता येणार आहे. त्याचसोबत यंदाच्या वर्षातील 12 वी पास झालेले विद्यार्थी या परिक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. तर 27 मार्च रोजी विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.(NEET 2019 Results : NEET परीक्षेचा निकाल जाहीर, देशातून नलीन खंडेलवाल तर महाराष्ट्रात सार्थक भट याने मारली बाजी)

नीट या परिक्षेचा पेपर तीन तासांचा असून त्यामध्ये तीन सेक्शन असणार आहेत. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयासंबंधित 180 प्रश्न विचारण्यात येणार आहेत.तर बायोलॉजीसाठी 90 प्रश्न, फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी प्रत्येकी 45-45 असे प्रश्न विचारले जाणार आहेत. तसेच नीट परिक्षेचा निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.