NEET 2019 Results : NEET परीक्षेचा निकाल जाहीर, देशातून नलीन खंडेलवाल तर महाराष्ट्रात सार्थक भट याने मारली बाजी
NEET Exam (Photo Credis- Facebook)

मेडिकल (Medical Entrance) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 'नीट' (NEET Exam)  प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राजस्थानच्या (Rajasthan) नलीन खंडेलवाल (Nalin Khandelwal) याने 99.99  पर्सेन्टाइल म्हणजे 701 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नलीनने माध्यमांशी संवाद साधताना आपल्या यशाचे श्रेय शिक्षकांना दिले आहे. हे यश मिळवण्यासाठी आपण दिवसातून आठ तास अभ्यास करत असल्याचे देखील नलिनने म्हंटले आहे. यासोबतच नीट परीक्षेत महाराष्ट्रातील सार्थक भट (Sarthak Bhat)  याने 695 गुण मिळवत राज्यात पहिला तर देशातून सहावा क्रमांक पटकावला आहे

नलीन खंडेलवाल (ANI ट्विट)

महाराष्ट्र राज्यात साईराज माने याने दुसरा तर सिद्धार्थ दाते याने तिसरा पटकावला. प्रत्येक परीक्षांप्रमाणे यंदा नीट मध्ये मात्र मुलींऐवजी मुलांनीच बाजी मारली असल्याचे समोर येत आहे. देशातून मुलींमध्ये माधुरी रेड्डी हिचा तर दिशा अगरवाल हिने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आपल्या नावी केला आहे. NEET Result 2019: नीट परीक्षेचा निकाल जाहीर; ntaneet.nic.in या वेबसाईटवर असा पहा रिझल्ट

 

यंदा 5-20 मे दरम्यान देशातील 156 शहरांत NEET परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेसाठी यंदा महाराष्ट्रातून 2 लाख 16 हजार 176 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 2  लाख 6  हजार 745 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ज्यामधून आज लागलेल्या निकालात 81 हजार 171 विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत. काहीच दिवसात मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे.