NEET Result 2019: नीट परीक्षेचा निकाल जाहीर; ntaneet.nic.in या वेबसाईटवर असा पहा रिझल्ट
Representational Image (Photo Credits: File Photo)

नॅशनल टेस्टिंग एजेंसी द्वारे आज नीट 2019 (NEET Result 2019) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाअसून या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना हा निकाल नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर ntaneet.nic.in पाहता येईल. एनटीएने NEET Answer Key 2019 गेल्या महिन्यात जारी केली असून त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी 31 मे 2019 ही शेवटची तारीख देण्यात आली होती. NTA NEET 2019 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रीया 1 नोव्हेंबर 2018 रोजी सुरु झाली होती.

वेबसाईटवर कसा पहाल निकाल?

# सर्वप्रथम ऑफिशियल साईट ntaneet.nic.in वर जा.

# त्यानंतर होमपेजवरील NEET Result 2019 या लिंकवर क्लिक करा.

# एक नवीन पेज ओपन होईल. यावर तुम्ही NEET रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड लिहा.

# ही माहिती भरल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

# त्यानंतर निकाल डाऊनलोड करण्याची किंवा त्याची प्रिंट घेण्याचीही सोय आहे.

5 मे रोजी देशातील 156 शहरांत NEET परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या परीक्षेला 15,19,375 विद्यार्थी बसले होते. तर NTA NEET परीक्षा 5-20 मे दरम्यान आयोजित करण्यात आली होती. मात्र ओडिशा आणि कर्नाटक येथे आलेल्या फनी वादळामुळे परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले होते. नीट परीक्षेचे आयोजन यापूर्वी CBSE बोर्ड करत होते. आता मात्र या परीक्षेचे आयोजन NTA द्वारा करण्यात येते.