इन्फोसिसचे (Infosys) संस्थापक एनआर नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी सरकारला प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांवर मोठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुढील 20 वर्षांत प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी किमान 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची गरज आहे, ज्याचे चांगले परिणाम दिसून येतील. इन्फोसिस पुरस्काराच्या एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. इन्फोसिस सायन्स फाउंडेशनने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. इन्फोसिसतर्फे दरवर्षी सहा श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो.
नारायण मूर्ती यांनी बुधवारी, 15 नोव्हेंबर रोजी सांगितले की, भारताने शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी दरवर्षी एक अब्ज डॉलर (सुमारे 83 अब्ज रुपये) खर्च केले पाहिजेत. यासाठी जगभरातून 10 हजार उच्च पात्र सेवानिवृत्त शिक्षकांना बोलावावे लागेल, जे आमच्या 2500 शिक्षकांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) मध्ये अधिक चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देऊ शकतील. हा प्रशिक्षण कार्यक्रम एक वर्षाचा असावा, असेही ते म्हणाले.
मूर्ती म्हणाले, ‘आम्ही आमचे शिक्षक आणि संशोधकांचा खूप आदर केला पाहिजे आणि त्यांना चांगले वेतन दिले पाहिजे. ते आमच्या तरुणांसाठी आदर्श आहेत. आम्ही आमच्या संशोधकांनाही चांगल्या सुविधा पुरवल्या पाहिजेत. यासाठीच आम्ही 2009 मध्ये इन्फोसिस पुरस्काराची स्थापना केली. भारतातील संशोधनाला पुढे नेण्यासाठी हे आमचे छोटे योगदान आहे.’ इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनद्वारे सहा श्रेणींमध्ये इन्फोसिस अवॉर्ड्स 2023 जाहीर करताना मूर्ती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘ट्रेन द टीचर’ हा कार्यक्रम वर्षभराचा असावा.
इन्फोसिसचे संस्थापक एन आर नारायण मूर्ती म्हणाले, ‘तज्ञांनी मला सांगितले आहे की चार प्रशिक्षकांचा एक संच एका वर्षात 100 प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि 100 माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देऊ शकतो. अशाप्रकारे या पद्धतीमुळे दरवर्षी 250,000 प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि 250,000 माध्यमिक शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देणे शक्य होईल. पुढे हे प्रशिक्षित भारतीय शिक्षक पाच वर्षांच्या कालावधीत स्वतः प्रशिक्षक बनू शकतात.’ (हेही वाचा: Financial Freedom Tips: कर्जमुक्त जीवन जगण्याचा वेगवान मार्ग, कसे मिळवाल आर्थिक स्वातंत्र्य? जाणून घ्या सात पर्याय)
मूर्ती पुढे म्हणाले, ‘आम्हाला शिक्षकांवर प्रति वर्ष सुमारे $100,000 खर्च करावे लहातील. या वीस वर्षांच्या कार्यक्रमासाठी प्रतिवर्ष US$1 अब्ज दराने US$20 बिलियन खर्च येईल. आपला देश पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या जीडीपीचे लक्ष्य ठेवत आहे. अशा परिस्थितीत देशातील शिक्षकांवरील हा खर्च फार मोठे आर्थिक ओझे वाटत नाही.’