UGC | File Image | (Photo Credits: PTI)

देशात शिक्षणाच्या नावाखाली फार मोठे रॅकेट सुरू आहे. डिग्रीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे. आता यूजीसीने (UGC) देशातील 24 विद्यापीठे 'बनावट' किंवा खोटी (Fake Universities) असल्याचे घोषित केली आहे. यामधील बहुतेक उत्तर प्रदेश, दिल्ली येथील आहेत. बनावट विद्यापीठे व संस्थांमुळे पदवी विद्यार्थ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. इतके पैसे खर्च करूनही विद्यार्थ्यांना साधी डिग्रीही मिळत नाही. अशी बनावट विद्यापीठे आणि संस्थांपासून विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यासाठी यूजीसीने 24 स्वयंघोषित बनावट आणि अपरिचित विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे.

त्यापैकी उत्तर प्रदेशात आठ, दिल्लीत सात आणि ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन विद्यापीठे कार्यरत आहेत. कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पुडुचेरी येथे 1 -1 अशी बनावट विद्यापीठे आहेत.

पहा यादी –

मैथिली युनिव्हर्सिटी दरभंगा, बिहार

कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड दरियागंज, दिल्ली

युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, दिल्ली

व्होकेशनल युनिव्हर्सिटी, दिल्ली

एडीआर सेंट्रिक ज्युडिशियल युनिव्हर्सिटी, दिल्ली

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजीनियरिंग, दिल्ली

विश्वकर्मा मुक्त विद्यापीठ स्वतंत्र रोजगार विद्यापीठ, दिल्ली

बडगणवी गव्हर्नमेंट ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी, कर्नाटक

सेंट जॉन युनिव्हर्सिटी, केरळ

रझा अरबी युनिव्हर्सिटी नागपूर, महाराष्ट्र

भारतीय वैकल्पिक चिकित्सा संस्था कोलकाता, बंगाल

भारतीय वैकल्पिक चिकित्सा व संशोधन कोलकाता, बंगाल

वाराणसी संस्कृत विद्यापीठ, उत्तर प्रदेश

महिला ग्राम विद्यापीठ, उत्तर प्रदेश

गांधी हिंदी विद्यावीठ

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर

उत्तर प्रदेश युनिव्हर्सिटी

महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विद्यापीठ

इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद

नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यावीठ

श्री बोधी अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, पुडुचेरी

नवभारत शिक्षण परिषद राउरकेला

उत्तर ओरिसा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ

(हेही वाचा: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलल्या)

दरम्यान, यूजीसीचे सचिव रजनीश जैन म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना आणि लोकांना माहिती देण्यात आली आहे की देशात सध्या यूजीसी कायद्याच्या विरोधात कार्यरत 24 स्वयंभू शैक्षणिक संस्था आहेत, ज्यांना बनावट विद्यापीठे म्हणून घोषित केले गेले आहे. अशा विद्यापीठांना कोणतीही डिग्री देण्याचा अधिकार नाही.’