Nagpur University's Online Exams Postponed: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलल्या

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील 13 विद्यापीठांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Nagpur University's Online Exams Postponed: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलल्या
Exam | Representational Image (Photo credits: Pixabay)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) अंतिम वर्षाच्या (Final Year) ऑनलाईन परीक्षा (Online Exam) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मंगळवारी (29 सप्टेंबर) हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील 13 विद्यापीठांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप (Non-Teaching Staff Strike) पुकारल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे डिरेक्टर प्रफुल्ल साबळे (Prafulla Sabale) यांनी दिली आहे.

परीक्षा 1 ऑक्टोबर पासून सुरु होणार असून यासाठी सुमारे 78000 विद्यार्थी बसणार होते. यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु आणि इतर विद्यापीठांच्या कुलगुरुंची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, अशी माहिती प्रफुल्ल साबळे यांनी पीटीआय (PTI) वृत्तसंस्थेला दिली आहे. दरम्यान, विद्यापीठातील शिक्षणेतर कर्मचाऱ्यांनी 24 सप्टेंबरपासून संप पुकारला आहे.

कोरोना व्हायरस संकटामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षांचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चिला गेला. परीक्षा होणार की नाही यावर वाद सुरु असताना अखेर सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याचा निर्णय दिला. त्यानंतर प्रदीर्घ काळ लांबलेल्या परीक्षा घेण्यासाठी राज्य सरकार सह विद्यापीठं तयारी करत असताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुन्हा एकदा परीक्षांना तात्पुरता ब्रेक लागला आहे. लवकरच यावर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या सर्व समस्यांमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताण वाढत आहे. (Mumbai University Exam 2020: मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेदरम्यान Digital Supervision द्वारे ठेवणार लक्ष; विद्यार्थ्यांचे इंटरनेट होणार फ्रीझ)

कोविड-19 संकटामुळे लांबलेल्या अंतिम वर्षांच्या परीक्षा 1 ऑक्टोबर पासून 750 महाविद्यालयांच्या परीक्षा होणार होत्या. ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या या परीक्षांसाठी विशेष नियामवली देखील जारी करण्यात आली होती. तसंच यासाठी सरकारकडून पूर्णपणे मदत केली जाईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले होते. तसंच अंतिम वर्षांचे निकालही कोविड शिक्काशिवाय असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2020 11:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).