Mumbai University Exam 2020: मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेदरम्यान Digital Supervision द्वारे ठेवणार लक्ष; विद्यार्थ्यांचे इंटरनेट होणार फ्रीझ
Mumbai University (Photo Credits- Facebook)

1 ऑक्टोबर पासून 750 महाविद्यालयांच्या होणाऱ्या परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) नवी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या पदवी परीक्षांचे परीवेक्षण (Supervision)  डिजिटल माध्यमातून करण्यात यावे, असे या गाईडलाईन्समध्ये म्हटले आहे. या परीक्षांसाठी सुमारे 2.5 लाख विद्यार्थी बसले असून त्यांचे परीवेक्षण कॅमेरा किंवा इतर डिजिटल साधनांचा वापर करुन करण्यात येईल.

सर्व विद्यार्थी आपल्या घरुनच परीक्षा देणार असल्यामुळे परीक्षा विद्यार्थ्याऐवजी दुसरं कोणी देत नाही ना, हे पाहणे देखील गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व महाविद्यालयांमध्ये कॅमेरा युक्त डिव्हाईसेस उपलब्ध करणे शक्य नाही. त्यासाठी एक सॉफ्टवर विकसित करण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर विद्यार्थी मोबाईल, लॅपटॉप किंवा डेक्सटॉपवर अॅक्सेस करु शकतात. त्याद्वारे कॉलेजचे सुपरव्हिजनचे काम अधिक सोपे होईल. परीक्षेपूर्वी महाविद्यालयांनी सर्व डिव्हाईस रजिस्टर करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा रजिस्टर्ड ई-मेल आयडी (email) आणि आयपी अॅड्रेस (IP Address) वापरुन त्याची अॅक्टीव्हीटी ट्रॅक करु शकतात. त्यासाठी ओटीपी बेस्ड सिस्टमचा वापर केला जावू शकतो.

सध्या परीक्षांसाठी गुगल फोरम हे सर्वाधिक प्रचलित टूल आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे मोबाईलमधील इंटरनेट फ्रीज होईल, अशा सॉफ्टवेअरचा वापर काही महाविद्यालयं करत आहेत. परीक्षा सुरु झाल्यानंतर काही वेळाच्या अंतराने फोटोज निघत राहतील, अशा सॉफ्टवेअरचा देखील वापर करण्यात येत आहे. परीक्षा सुरु असताना जर विद्यार्थी स्क्रीनशिवाय दुसरीकडे बघत असेल तर तो कॉपी करतोय, असे मानले जाईल.

विद्यापीठांच्या परीक्षांसाठी नियुक्त केलेले सल्लागार टी. ए. शिवारे यांनी असे म्हटले की, विद्यार्थ्यांना होणाऱ्या गैरसोयीसाठी हेल्पलाईन सेटअप केलेली आहे. त्याचप्रमाणे या परीक्षांसाठी 5 सर्व्हर्सची देखील सोय करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईमधील व्हिलसन कॉलेज हे त्या भागातील सर्व कॉलेजेच्या डिजिटल परिवेक्षणाचे काम पाहिल. दरम्यान, सर्व महाविद्यालयं यासाठी अजून तयार नाहीत. तसंच या सॉफ्टवेअर आणि प्लगइन्ससाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे एका परीक्षेला 30-150 रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे आर्थिक बाबींकडे लक्ष देणेही गरजेचे आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी असे सांगितले की, विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा घेण्यासाठी सरकारकडून पूर्णपणे मदत करण्यात येईल. तसंच सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्षांचे निकालही कोविड शिक्काशिवाय देण्यात येतील.