![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/07/Uday-Samant-1-380x214.jpg)
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रात आता विद्यापीठीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा (University Final Year Exams In Maharashtra) कधी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. ही उत्सुकता कायम असतानाच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज (गुरुवार, 3 सप्टेंबर 2020) महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंचा अहवाल प्राप्त होताच त्यावर विचार केला जाईल. आणि पुढील निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. कोरना व्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोणताही धोका होऊ नये यासाठी शासन, प्रशासन सावध भुमिका घेताना दिसत आहेत.
उदय सामंत यांनी पुढे बोलताना सांगितले की, ऑक्टोबर महिन्यातच मुख्य परीक्षा घेऊन निकालही 31 ऑक्टोबर पूर्वी लावावा असा राज्य सरकारचा मानस आहे. त्यासोबतच 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रॅक्टिकल परीक्षा होऊ शकतात, अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे. (हेही वाचा, JEE Exams: भंंडारा, गडचिरोली मध्ये पुर पण विदर्भात जेईई परिक्षा पुढे ढकलणार नाही- मुंंबई उच्च न्यायालय नागपुर खंंडपीठ)
विद्यार्थी आणि पालकांना फारसा त्रास होणार नाही याची दक्षता घेत सोप्यतल्या सोप्या पद्धीतीने परीक्षा घेण्यावर भर देण्यात येईल. साध्या, सोप्या पद्धतीन परीक्षा घेण्यास राज्यापालांनीही मंजुरी दिली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार या परीक्षा शक्य तितक्या लवकर घेतल्या जातील असेही सामंत म्हणाले.