JEE Exams: भंंडारा, गडचिरोली मध्ये पुर पण विदर्भात जेईई परिक्षा पुढे ढकलणार नाही- मुंंबई उच्च न्यायालय नागपुर खंंडपीठ
Bhandara Flood JEE Exams (Photo Credits: File Image/ Twitter)

भंडारा (Bhandara Flood) येथे ओढावलेल्या पुर संंकटामुळे आजपासुन सुरु होणार्‍या जेईई परिक्षेला (JEE Exams)  कसे जायचे असा प्रश्न एका विद्यार्थ्याने मुंंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपुर खंंडपीठाकडे (Nagpur Bench) केला होता, भंंडारा, गडचिरोली (Gadchiroli)  भागातील सध्याची परिस्थीती पाहता निदान विदर्भासाठी तरी जेईई आणि नीट परिक्षा (NEET Exam) पुढे ढकलावी अशी मागणी सुद्धा या विद्यार्थ्याने ईमेल मधुन केली होती, या मेल ला पीआयएलच्या रुपात स्वीकारुन आज सकाळी 8.30 वाजता नागपुर खंंडपीठात तात्काळ सुनावणी घेण्यात आली होती, यामध्ये खंंडपीठाने नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलता येणार नाही त्यामुळे ज्यांंना पुरामुळे परीक्षा केंद्रांपर्यंत जाण्यास अडथळा येत आहे त्यांंनी राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) वर अर्ज करुन याबाबत माहिती मिळवावी असेही सांगण्यात आले आहे.

JEE Mains 2020 Exams: कोरोनाच्या सावटाखाली आजपासून देशभरात जेईई मुख्य परीक्षेला सुरूवात

विदर्भात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला हे जेईई परीक्षा केंद्र आहेत. याठिकाणी परीक्षा ही सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत होणार आहे. जवळपास 15 हजारांहून अधिक विद्यार्थी 'जेईई-मेन्स'मध्ये सहभागी होणार आहेत. पुराच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना माहिती देत याप्रकरणात लक्ष घालण्याची विनंंती केली होती, ज्यावर एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन धोत्रे यांंनी दिले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, आज देशभरात जेईई परीक्षेला सुरुवात झाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाइन्स नुसार परिक्षा केंद्रावर सोशल डिस्टंसिंंग चे पालन करत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.