निर्धर पक्का असेल तर तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. अगदी नियतीसुद्धा. झारखंड (Gwalior) राज्यातील धनंजय मांझी (Dhananjay Manjhi) आणि त्यांच्या पत्नी सोनी मांझी यांच्याबाबतही असेच घडले आहे. धनंजय यांनी पत्नी सोनी हिचे डीईएलईडी (DElEd ) अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि तिला परीक्षा देता यावी यासाठी 10-20 नव्हे तर तर चक्क 1100 किलोमीटर स्कुटी चालवली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळनात मोठा विकास केलेल्या आपल्या देशांतील अनेकांसाठी ही घटना अविश्वसनीय आहे. पण असे खरोखरच घडले आहे.
धनंजय मांझी यांच्या पतनी सोनी या गर्भवती असून, त्यांनी ग्वालियर येथे येऊन डिप्लोमा इन एलिमेंटरी एजुकेशन (Diploma in Elementary Education) या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची परीक्षा दिली आहे. गर्भवती असल्यामळे त्यांच्या हालचालींवर मोठ्या मर्यादा आल्या होत्या. मात्र, परीक्षा देण्याची त्यांची इच्छा अत्यंत तीव्र होती. पत्नीची इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार धनांजय मांझी यांनी घेतला.
पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी धनंजय यांनी निर्धार तर केला. परंतू, कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन या कारणांमुळे सर्व यंत्रणा ठप्प होती. त्यामुळे ना त्यांना वाहन उपलब्ध झाले ना पर्याय मिळाला. अशा वेळी त्यांनी थेट स्टुटीवरुन परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पत्नीला स्कुटीवर घेतले आणि आकराशे किलोमीटर अंतर पार करत ते परीक्षा देण्यासाठी ग्वालियर येथे पोहोचले. (हेही वाचा, http://cmsmarathi.letsly.in/social-viral/coronavirus-husband-travel-with-bicycle-from-uttar-pradesh-amethi-to-bihar-600-km-for-meet-sick-wife-during-lockdown-120907.html)
धनांजय माझी यांनी सांगितले की, आकराशे किलोमीटर इतके अंतर पार करण्यासाठी त्यांना पेट्रोलसाठी 2000 रुपयांपेक्षा अधिक खर्च आला. ही परीक्षा देण्यासाठी ते झारखंड राज्यातील गोंडा येथून मध्य प्रदेशातील ग्वालियर पर्यंत पोहोचले.
धनंजय यांची पत्नी सोनी ग्वालियर येथील एका खासगी कॉलेजमधून डीईएलडीएड अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतात. हे त्यांचे दुसरे वर्ष आहे. सोनी या 7 महिन्यांच्या गर्भवती आहेत. तर पती धनंजय मांझी हे स्वयंपाकी म्हणून काम करतात. आपली पत्नी शिकावी शिकून तिने नोकरी करावी अशी त्यांची इच्छा आहे.(हेही वाचा, Lockdown: 65 वर्षीय व्यक्तिचा सायकलवरुन 130 किलोमीटर प्रवास; कर्करोगग्रस्त पत्नीच्या Chemotherapy उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, तामिळनाडू राज्यातील घटना)
धनंजय यांनी पुढे सांगितले की, कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे त्यांना वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. जे उपलब्ध झाले त्यांनी गोंडा ते ग्वालियर पर्यंत पोहोचण्यासाठी 15 हजार रुपये प्रती सिट मागितले. म्हणजे पती पत्नी असे दोघांचे मिळून 30,000 हजार रुपये इतका खर्च सांगितला.त्यामुळे त्यांनी आपल्या स्कुटीवरुन ग्वालीयरपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे पैसे नव्हते. परंतू, पत्नीचे दागिणे गहाण ठेऊन त्यांनी गोंडा ते ग्वालियर हे आंतर पार केले.
ग्वालियर येथे डीईएलडीएड परीक्षा 12 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. त्यासाठी धनंजय यांनी एक खोली भाड्याने घेतली आहे. खोलीच्या भाड्यापठी त्यांना 1500 रुपये प्रतिमहिना भाडे आहे. त्यांच्या खोलीपासून परिक्षा केंद्र सुमारे 11 ते 11.50 किलोमीटर दूर आहे. धनंजय यांचे झारखंडमधील गाव गोंडा जिल्ह्यातील टोला हे आहे. जे बांग्लादेश सीमेपासून जवळ आहे. पत्नीच्या परीक्षेसाठी धनंजय झारखंड येथून बिहार, उत्तरप्रदेशमधील रस्त्यांनी थेट ग्वालियरला पोहोचले.