Bhagavad Gita | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये (NCERT Textbooks) इयत्ता सहावी आणि सातवीमधील श्रीमद भगवद्गीतेचे (Shrimad Bhagavad Geeta) संदर्भ आणि इयत्ता अकरावी आणि बारावीच्या संस्कृत पाठ्यपुस्तकांमध्ये त्यातील श्लोकांचा समावेश (Bhagavad Gita in NCERT Syllabus) करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत (Lok Sabha ) देण्यात आली. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे शालेय अभ्यासक्रमात धार्मिक धडे गिरवले जाणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांना धार्मिक ग्रंथांचा समावेश करणे किती परिणामकारक ठरु शकतो. त्याचे फायदे तोटे काय हे कळण्यासाठी काही काळच जावा लागणार आहे.

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री, अन्नपूर्णा देवी यांनी एका लेखी उत्तरात सभागृहाला सांगितले की, मंत्रालयाने 2020 मध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) मध्ये भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) विभागाची स्थापना आंतरशाखीय आणि ट्रान्स-डिसिप्लिनरीला प्रोत्साहन देण्यासाठी केली आहे. भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) च्या सर्व पैलूंवर संशोधन आणि सामाजिक प्रयोगांसाठी ज्ञान जतन संवर्धन आणि प्रसारीत करेन असे त्यांनी म्हटले. (हेही वाचा, VHP On Shivraj Patil: शिवराज पाटील यांच्या भगवद्गीतेबद्दलच्या दाव्यावर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्याने दिले प्रत्यूत्तर, म्हणाले - प्रसिद्धीसाठी आणि समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी केली टीका)

अन्नपूर्णा देवी यांनी पुढे बोलताना सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने राष्ट्रीय अभ्यासक्रम मसुदा विकसित करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी विविध मंत्रालये, विभाग, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह तळागाळातील स्तरांवरून विविध भागधारकांकडून माहिती आणि सहभाग नोंदविण्यात येतो आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताच्या पारंपारिक ज्ञानाचा संदर्भ देते. जे शाश्वत आहे आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे, असे राज्यमंत्र्यांनी म्हटले.