11th Std CET Format: 11 वी प्रवेशासाठी सीईटी परिक्षेचा पॅटर्न जाहीर, जाणून Exam बद्दल अधिक माहिती
Representational Image (Photo Credits: Pixabay)

11th Std CET Format: दहावी परिक्षेचा निकाल लागल्यानंतर आता 11वी मध्ये प्रवेश कसा घ्यायचा हा प्रश्न सर्व पालकांसह विद्यार्थ्यांना पडला आहे. अशातच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ परीक्षा परिषदेमार्फत आयोजित होणाऱ्या अकारावी सीईटीचे पॅटर्न जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सीईटी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परिक्षेसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्र विषयावर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असणार आहेत. ही परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रश्न हे Multipal Objective Type Question असणार आहेत.(Maharashtra SSC Result 2021 Date: इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल, जुलै महिन्यात 'या' तारखेला जाहीर होण्याची शक्यता)

अकरावी सीईटी 100 गुणांची असणार असून 2 तासामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यास वेळ मिळणार आहे. परिक्षा केंद्राची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषित केली जाणार आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर पोर्टलवर परिक्षेला बसायचे की नाही हा ऑप्शन विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. तर सीईटी परिक्षेसाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु सीबीएसई, आयएससीई आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र सीईटीसाठी शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे.(Maharashtra 12th Board Result 2021: राज्यातील बारावीच्या परीक्षेच्या निकालासाठी 30:30:40 नुसार मूल्यमापन होणार, वर्षा गाडकवाड यांची माहिती)

दहावीचा निकाल 15 जुलैच्या दरम्यान लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर निकालाच्या 2 आठवड्यांनी सीईटीची परिक्षा घेतली जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सीईटी परिक्षेसाठी अभ्यास करण्यास सुरुवात करावी असे सांगण्यात आले आहे. तर 11 वी मध्ये प्रवेश हा तुम्हाला सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर दिला जाणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली नाही त्यांच्यासाठी महाविद्यालयातील शिल्लक जागी प्रवेश दिला जाणारआहे. पण त्यांना दहावीच्या मुल्यमापन पद्धतीच्या गुणांच्या आधारावर असणार आहे.