Exam (Photo Credits: Facebook)

Maharashtra 12th Board Result 2021: बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवर मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे,यासाठी महाराष्ट्र आग्रही होता. त्यानुसार मुलांच्या मूल्यमापनात सुसुत्रूता/एकवाक्यता रहावी म्हणून केंद्रीय मंडळांनी जाहीर केलेल्या धोरणाशी सुसंगत असा धोरण आम्ही तयार केल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे.(Maharashtra Anganwadi Recruitment 2021: बाल विकास प्रकल्प जालना कडून होणार अंगणवाडी सेविकांची नोकरभरती; 9 जुलै पूर्वी करा अर्ज)

लेखीपरीक्षेसाठी निर्धारित एकूण गुणांपैकी 30 टक्के गुण इ.10 वी परीक्षेत सर्वाधिक गुणप्राप्त 3 विषयांची सरासरी,इ.11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय 30%गुण,इ.12वी वर्षातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्रपरीक्षा,सराव परीक्षा-चाचण्या,तत्सम मूल्यमापनातील विषयनिहाय 40%गुण अवलंबून असतील.

विद्यार्थ्यांचे एकूण मूल्यांकन लेखी आणि अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापनाआधारे ठरवले जाईल. अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा / अंतर्गत मूल्यमापन विहित कार्यपद्धतीनुसार केलं जाईल. यात प्रत्यक्ष प्राप्त गुण अंतिम निकालात समाविष्ट केले जातील.

Tweet:

राज्यमंडळाच्या इ.१२वी परीक्षा रद्द केल्यानंतर सर्व घटकाशी चर्चा करून विद्यार्थ्यांची मूल्यमापन व गुणदान कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.यंदा १२वी परीक्षेस प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर अंतर्गत मूल्यांकनाआधारे उत्तीर्ण करण्यासाठी राज्यशासनाने मंजुरी दिलीय.(Maharashtra SSC Result 2021 Date: इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल, जुलै महिन्यात 'या' तारखेला जाहीर होण्याची शक्यता)

Tweet:

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी असे म्हटले  की, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल यंदा इयत्ता नवीच्या आणि इयत्ता दहावीच्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन पद्धतीवर अवलंबून असणार आहे. अंतर्गत मुल्यमापनानंतर हा निकाल आम्ही जून अखेरपर्यंत जाहीर करु. जे विद्यार्थी या निकालाबाबत समाधानी नसतील ते नंतर सीईटी परीक्षा नंतर देऊ शकतात, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले होत.