राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल पुढच्या महिन्यात जाहीर होणे अपेक्षीत आहे. प्राप्त माहितीनुसार, हा निकाल येत्या 15 जुलै 2021 रोजी जाहीर हाण्याची शक्यता आहे. एमएसबीएसएचएसई (MSBSHSE ) द्वारे हा निकाल जाहीर केला जातो. इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल 2021 (Class 10 Board Result 2021) आपण mahresult.nic.in. या संकेतस्थळावर पाहू शकता. कोरोना व्हायरस महामारी आणि त्यावर उपाययोजना म्हणून लागू करण्यात आलेल लॉकडाऊन, निर्बंध आदीमुळे यंदा शाळाच सुरु होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे यंदा इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेच्या निकाल आणि गुणदान आदी पद्धतीत बदल करण्यात आला आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले की, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल यंदा इयत्ता नवीच्या आणि इयत्ता दहावीच्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन (internal marks) पद्धतीवर अवलंबून असणार आहे. अंतर्गत मुल्यमापनानंतर हा निकाल आम्ही जून अखेरपर्यंत जाहीर करु. जे विद्यार्थी या निकालाबाबत समाधानी नसतील ते नंतर सीईटी परीक्षा (CET Exams) नंतर देऊ शकतात, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले होत.
Maharashtra SSC Result 2021 कुठे पाहाल?
इयत्ता 10वी परीक्षा निकाल पाहण्यासाठी mahresults.nic.in, sscresult.mkcl.org, maharashtraeducation.com या संकेतस्थळांना भेट द्या.
Maharashtra SSC Result 2021 कसा पाहाल?
प्रथम वर दिलेल्या संकेतस्थळांवर जा. त्यानंतर संबंधित संकेतस्थलाच्या होमपेजवर SSC Examination Result 2021 या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या स्क्रिनवर नवे पेज उघडेल. त्यावर तुमचा रोल क्रमांक आणि इतर तपशील भरा. समबीट पर्यायावर क्लिक करा. तुमचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल (Maharashtra SSC Result 2021) तुमच्या स्क्रिनवर दिसू लागेल. हा निकाल तुम्ही डाऊनलोड करु शकता. प्रिंटही काढू शकता.