Maharashtra Anganwadi Recruitment 2021: बाल विकास प्रकल्प जालना कडून होणार अंगणवाडी सेविकांची नोकरभरती; 9 जुलै पूर्वी करा अर्ज
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

महाराष्ट्रामध्ये कोरोना संकटात आरोग्यकर्मचार्‍यांसोबतच अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi Sevika) देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या बाल विकास प्रकल्प जालना मधून अंगणवाडी सेविका पदांसाठी मोठी नोकरभारती जाहीर करण्यात आली आहे. महिलांना नोकरीची संधी देत घराघरात आरोग्य सेवा पोहचवण्याचं महत्त्वाचं काम सरकार मधून केले जात आहे. सध्या अंगणवाडी सेविका आणि मिनि सेविका अशा पदांसाठी ही नोकरभरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छूक महिला उमेदवारांना 9 जुलै 2021 पर्यंत ऑफलाईन माध्यमातून आपला अर्ज सादर करायचा आहे. ( नक्की वाचा: Sarkari Naukari: बीएमसी मध्ये सहायक आयुक्त, अधिष्ठाता वर्गासाठी होणार नोकरभरती; MPSC द्वारा होणार निवड).

अंगणवाडी सेविका, मिनीसेविका,मदतनीस मिळून 18 जागांवर नोकरभरती केली जाणार आहे. त्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला या किमान सातवी किंवा दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तर वयोमर्यादा ही 21 ते 30 वर्ष असणं आवश्यक आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती कार्यालय, घनसावंगी या पत्त्यावर इच्छूक उमेदवार आपला अर्ज करू शकतात. इथे पहा नोटिफिकेशन .

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या टास्क फोर्सने राज्यातील आंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्यासोबत ऑनलाईन माध्यमातून चर्चा केली आहे. राज्यातील संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असू शकते असा अंदाज बांधताना त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी आणि जनाजागृती करण्याचं मोलाचं काम अंगणवाडी सेविका करत आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात या अंगणवाडी सेविकांवरही कोरोना रोखण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी आहे.