धक्कादायक! नागालँड आणि म्यानमार येथे भूकंपाचे हादरे
Earthquake (Photo Credits: ANI)

भारताच्या पूर्वेकडील राज्य नागालँड (Nagaland) येथे भूकंपाचे हादरे बसले आहेत. तसेच म्यानमार (Myanmar) येथेही आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले गेले आहेत. युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरने (European Mediterranean Seismological Centre) दिलेल्या माहितीनुसार, नागालँड येथे सकाळी भूकंपाचे हादरे जाणवले गेले आहेत. रिश्टर स्केलवर ४.७ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. हा भूकंप नागालँड येथील तूसेंग या शहरापासून १३२ किमी अंतरावर नोंदवला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या धक्क्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजून १९ मिं म्यानमार येथे भूकंप आला. रिश्टर स्केलवर ५.१ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच म्यानमार येथेही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे देखील वाचा- तामिळनाडू: गंगाई अम्मन मंदिराजवळ स्फोट; १ ठार, ४ जखमी.

भूकंपाचे कारणे-

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतात. मोठया धरणाचा जमिनीवर पडणारा ताण, खाण काम, मोठया रस्त्याचा कामासाठी सुरुंग लावाणे, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होतात. पृथ्वीच्या पोटात प्रचंड उष्णता असल्याकारणाने त्यात असलेला तप्त लाव्हारस उफाळून वर येऊन भूकंप होतात.