photo credit- twitter

तामिळनाडूच्या  (TamilNadu) कांचीपुरम (Kanchipuram) येथील गंगाई अम्मन मंदिराजवळ (Gnagai Amman Temple) अचानक स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. या स्फोटात एक व्यक्ती जागीच ठार झाला असून ४ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळच्या दरम्यान ५ संशयित व्यक्ती मंदिराजवळ फिरत होते. तसेच त्याच्या हातात एक बॉक्स होता. त्यानंतर त्यांच्या हातात असलेला बॉक्स त्यांनी उघडला आणि स्फोट झाला, असे प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले आहे. या घटनेत एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट करणारे व्यक्ती कोण होते? स्फोट करण्यामागचे नेमके कारण काय आहे? याचा स्थानिक पोलीस कसून शोध घेत आहेत. हे देखील वाचा-अहमदनगर: एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पारनेर तारुक्यातील गुणोरे गावातील घटना

एएनआयचे (ANI)  ट्वीट-

तसेच, मंदिराजवळ स्फोट झाल्याचे समजताच बॉम्ब पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब पथकाने परिसरातील नमुने जप्त केले आहेत. तो आयईडी स्फोट होता की नाही? याची चाचणी सुरू आहे.