अहमदनगर: एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पारनेर तारुक्यातील गुणोरे गावातील घटना
प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credits: ANI)

एकाच कुटुंबातील चौंघानी आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पारनेर (Parner Taluka) तालुक्यात असलेल्या गुणोरे (Ganore Village) गावात घडली. आत्महत्या केलेले कुटुंब हे शेतकरी असल्याचे समजते. मृतांमध्ये बाबाजी बडे नावाच्या व्यक्तिचा समावेश आहे. बाबाजी बडे हे शेतकरी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. बाबाजी बडे, त्यांची पत्नी आणि दोन मुले अशा सर्वांनीच आत्महत्या केली आहे. एकाच वेळी या सर्वांनी आत्महत्या का केली असावी या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप मिळू शकले नाही.

प्राप्त माहितीनुसार, बाबाजी बडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी (26 ऑगस्ट 2019) रात्री आत्महत्या केली. त्यानंतर सकाळच्या सुमारास शेजाऱ्यांना या घटनेची माहिती कळाली. शेजाऱ्यांनी घडल्या प्रकाराची माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. (हेही वाचा, पुणे: मुलांची हत्या आणि आईची आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा! वडिलांकडूनच दोन्ही चिमुरडींवर बलात्कार)

प्राथमिक माहितीनुसार, बाबाजी बडे हे आपली पत्नी आणि दोन मुले यांच्यासमवेत राहात असत. बडे यांच्या पत्नीला मानसिक त्रास होत असे. तर, त्यांचा मोठा मुलगा हा अपंग होता. छोट मुलगा अल्पवयीन होता. एकाच वेळी कुटुंबातील सर्वांनीच आत्महत्या केल्याने नेमके काय घडले असावे याबाबत पोलिसांमध्ये उत्सुकता तर, परिसरात घबराट आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातही खळबळ उडाली असून, एकच चर्चा सुरु झाली आहे.