पुणे: मुलांची हत्या आणि आईची आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा! वडिलांकडूनच दोन्ही चिमुरडींवर बलात्कार
Representational Image (Photo Credits: ANI)

पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरात रविवार (28 जुलै) दिवशी एका आईने पोटच्या तिन्ही मुलांना ठार मारून स्वतःदेखील आत्महत्या केल्याचे वृत्त मन खिन्न करणारे होते. या आत्महत्या प्रकरणामध्ये कोणतीही चिठ्ठी न सापडल्याने यामागील नेमकं कारण समजत नव्हते. मात्र रात्री उशिरा या प्रकरणामध्ये अजून एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. तीन चिमुरड्यांपैकी दोन मुलींवर बलात्कार त्यांच्या वडिलांकडूनच झाल्याचं आता समोर आलं आहे. हा धक्कादायक प्रकार आईला समजल्यानंतर तिने मुलांसह आपलं आयुष्य संपवण्याचा टोकाचा  निर्णय घेतला आहे. पुणे: गळफास लावून आत्महत्या केलेल्या महिलेच्या दोन मुलींवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट, एका आरोपीला अटक

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये वडिलांकडून दोन्ही मुलींवर बलात्कार झाल्याचं सांगण्यात आलं आहे.आत्महत्या झाल्यानंतर चौघांचेही  शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालामध्ये 7 आणि 9 वर्षीय पोटच्या मुलींवर बलात्कार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. हे नराधमी कृत्य त्या चिमुरडीच्या वडिलांकडूनच करण्यात आलं आहे. या दांम्पत्यामध्ये सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. सुरूवातीला आर्थिक चणचणीमधून ही आत्महत्या झाल्याचं समोर आलं होतं मात्र आता यामागे बलात्कार हे कारण असल्याच पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. (पुणे: पोटच्या 3 मुलांची हत्या करून आईने केली गळफास घेऊन आत्महत्या)

पुण्यामध्ये हे दांम्पत्य भाड्याच्या घरात राहत होते. तिन्ही मुलं एका खोलीत मृतावस्थेत आढळली आहेत. तर आईने दुसर्‍या खोलीत गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. आरोपी  फळ विक्रेता असून तो घरी परतल्यानंतर हा सारा प्रकार उघडकीस आला आहे.