पुणे: पोटच्या 3 मुलांची हत्या करून आईने केली गळफास घेऊन आत्महत्या

फातिमा आणि तिचा पती सतत आर्थिक चणचणीच्या कारणावरून भांडत होते तर ते नुकतेच पुण्यात भाड्याच्या घरात राहण्यास आले होते. सध्या या प्रकरणी पुणे पोलिस अधिक तपास करत आहेत.या कारणावरून त्यांनी जीवन संपवले आहे.

पुणे:  पोटच्या  3 मुलांची हत्या करून आईने केली गळफास घेऊन आत्महत्या
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पुण्यामध्ये एका आईने आपल्या तीन मुलांना ठार मारून स्वतः गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना पुण्याच्या नूर मोहल्ला या भागातील आहे. या आत्महत्येच्या घटनेनंतर या परिसरात खळबळ पसरली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये या आत्महत्येचं वृत्त समजाताच पोलिस तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे या आत्महत्येचं नेमकं कारण काय असावं? यासाठी अधिक तपास सुरू आहे.

पुण्यातील ही आत्महत्या आर्थिक चणचणीमधून केल्याचं म्हटलं आहे. फातिमा भगवान असं या महिलेचं नाव असून तिने स्वतःसोबतच दोन मुली आणि एका मुलाचं देखील आयुष्य संपवलं आहे. ही घटना भोसरी येथील पिंपरी चिंचवड भागात घडली आहे. मृत मुलं ही नऊ वर्षांपेक्षाही कमी वयाची आहेत. तिन्ही मुलं एका खोलीत मृतावस्थेत आढळली आहेत. तर आईने दुसर्‍या खोलीत गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. फातिमाचा पती हा फळ विक्रेता असून तो घरी परतल्यानंतर हा सारा प्रकार उघडकीस आला आहे.

ANI Tweet 

फातिमा आणि तिचा पती सतत आर्थिक चणचणीच्या कारणावरून भांडत होते तर ते नुकतेच पुण्यात भाड्याच्या घरात राहण्यास आले होते. सध्या या प्रकरणी पुणे पोलिस अधिक तपास करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2019 11:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).