Rahul Gandhi | (Photo Credit: ANI/Twitter)

कांग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारतात वाढत असलेल्या वाढत्या कोरोना व्हायरस प्रादुर्भावावरुन Health Professionals सोबत चर्चा केली. राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त पब्लिक हेल्थ प्रोफेशनल आशीष झा आणि प्रसिद्ध स्वीडिश एपिडेमियोलॉजिस्ट जोहान गिसेके यांच्यासोबत चर्चा केली. राहुल गांधी यांनी प्रोफेसर झा यांना विचारले की भारत आणि जगभरातील अनेक देशांनी लागू केलेल्या लॉकडाऊन बाबत आपण काय विचार करता, त्याकडे कसे पाहता? मानसशास्त्रीय दृष्ट्या त्याचा मानवावर काय परिणाम होईल.

प्रोफेसर झा यांनी उत्तरादाखल बोलताना सांगितले की, लॉकडाऊन लागू करुन आपण कोरना व्हायरस संक्रमनाचा वेग कमी करु शकता. परंतू, कोरोना व्हायरस नियंत्रणात ठेवायचा तर व्हायरस पीडित व्यक्तिला समाजापासून वेगळे ठेवायला हवे. तसेच, त्याची सातत्याने चाचणी करायला हवी. लॉकडाऊन कोरोना व्हायरस वाढीची गती कमी करण्यास मदत करतो.

एएनआय ट्विट

पुढे राहुल गांधी यांनी विचारले की, लॉकडाउन (Lockdown) घेतल्यामुळे देशातील कामगारांवर मोठा परिणाम होत आहे. कारण की कामगारांना हे माहिती नाही की ही परिस्थिती आणखी किती काळ चालणार आहे. कधी आटोक्यात येणार आहे. झा यांनी सांगितले की हा व्हायरस इतक्यात संपणारा नाही. हा व्हायरस 2021 पर्यंत राहू शकतो. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांना दररोज मदत करायला हवी. ज्यामुळे या मजूरांना भविष्याबाबत विचार करण्याची नवी दृष्टी मिळेन. लॉकडाऊनमुळे नेमके किती नुकसान होऊ शकते, याबाबत अद्याप कोणालाच काही माहिती नाही. (हेही वाचा, Lockdown: लॉकडाऊन पूर्णपणे अयशस्वी, केंद्र सरकारकडे प्लान बी नाही- राहुल गांधी)

एएनआय ट्विट

कोरना व्हायरस चाचणी बाबत काय रणनिती असावी असे राहुल गांधी यांनी विचारले असता, प्रोफेसर आशीष झा यांनी सांगितले की, दक्षिण कोरियामध्ये कोरोना चाचणी घेण्याबाबत योग्य ती रणनिती आखण्यात आली आहे. ती उत्तम आहे. जास्तीत जास्त टेस्ट करणे आवश्यक आहे. आपणास अशीही ठिकाणं शोधता आणि ओळखता आली पाहिजेत, ज्या ठिकाणी कोरोना व्हायरस संक्रमन वेग अधिक आहे. जी व्यक्ती रुग्णालयात आली आहे, त्या प्रत्येक रुग्णाची टेस्ट (चाचणी) होणे आवश्यक आहे.