Rahul Gandhi | (Photo Credit: ANI/Twitter)

काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भारतामध्ये लॉकडाऊन (Lockdown) पूर्णपणे अयशस्वी झाला आहे. केंद्र सरकारकडे प्लॉन बी काहीच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, आम्ही 21 दिवसांचे युद्ध लढण्यासाठी मैदानात उतरत आहोत. आज 60 दिवस होत आले पण हे युद्ध सुरुच आहे. भारत हा जगभरातील एकमेव देश आहे, ज्या देशात उपाययोजना सुरु असताना कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, भारतात लॉकडाऊन अयशस्वी झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे लक्ष्य ठेवले होते ते पूर्ण झाले नाही. आम्ही विनम्रतापूर्वक सरकारला विचारु इच्छितो की, आता सरकारचा प्लान बी काय आहे?, असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला आहे.

काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत आहे.  सत्तेत असलो, तरी मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार काँग्रेसला नाहीत. महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. मात्र केंद्र सरकारनं महाराष्ट्राला मदत करायला हवी. खास करुन मुबई दिल्ली या शहरांबाबत बोलायचे तर तिथे दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे तिथे कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, असेही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस पक्ष माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी लॉकडाऊन, कोरोना व्हायरस नियंत्रण या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाध साधला. राहुल गांधी यांनी या विषयावर घेतलेली ही चौथी पत्रकार परिषद आहे.

एएनआय ट्विट

व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सांगितले की, लॉकडाऊनचे 4 टप्पे या आधी अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे सरकारसमोर प्लान बी काय आहे? असला तर सरकारने तो जाहीर करावा. कष्टकरी, मजूर वर्गाची आवस्था काय आहे, MSMEs कसे उभारणार आहात? सरकार सांगते की, GDP च्या 10% पॅकेज दिले आहे. प्रत्यक्षात GDP च्या 10% पॅकेज मिळाले आहे. (हेही वाचा, मोदी सरकार-2 च्या वर्षपूर्तीसाठी 'BJP'चा मेगा प्लॅन; 1000 प्रेस कॉन्फरन्स, 750 व्हर्च्युअल रॅलींचे आयोजन)

एएनआय ट्विट

गेल्याच आठवड्यात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती की, तेव्हाही राहुल गांधी यांनी म्हटले होते की, लॉकडाऊन काळात कोरोना व्हायरस संसर्ग कमी व्हायला हवा होता. मात्र, तसे घडले नाही. कोरोना व्हायरस पसरतच चालला आहे. केंद्र सरकार लॉकडाऊन काळात जनतेला मदत केल्याचे सांगत आहे. मात्र, तसे नाही. जनतेला कर्जाची नव्हे तर मदतीची गरज असल््याचे राहुल यांनी म्हटले होते.