Bird Flu प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Kerala Bird Flu Outbreak: केरळ (Kerala) मधील अलप्पुझा जिल्ह्यात दोन ठिकाणी बर्ड फ्लूचा (Bird Flu) प्रादुर्भाव आढळून आला आहे. एडठवा ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 मधील एका भागात आणि चेरुठाणा ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 मधील दुसऱ्या भागात पाळलेल्या बदकांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुसंवर्धन विभागाने 12 सीमा तपासणी नाक्यांवर चोवीस तास पाळत ठेवली आहे. या सर्व चेकपोस्टवर एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि इतर चार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोंबड्यांचे मांस, अंडी आणि बदकांची वाहतूक करणारी वाहने थांबवून परत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

12 एप्रिलपासून एडठवा येथे 3 हजार पक्षी तर चेरुथना येथे 250 पक्षी मारले गेले आहेत. मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले असता, त्यांच्यामध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) म्हणजेच बर्ड फ्लूची पुष्टी झाली. अधिकाऱ्यांनी बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटरच्या परिघात सर्व पाळीव पक्षी मारून नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - Bird Flu Pandemic: कोरोनापेक्षा 100 पट वाईट असू शकते बर्ड फ्लू महामारी; तज्ञांनी व्यक्त केली चिंता)

बर्ड फ्लू/ एव्हीयन इन्फ्लूएंझा म्हणजे काय?

एव्हियन फ्लूला बर्ड फ्लू किंवा एव्हियन फ्लू म्हणतात. हा आजार पहिल्यांदा 2003 मध्ये व्हिएतनाममध्ये आढळून आला होता. हा पक्ष्यांचा आजार आहे, जो खूप जीवघेणा आहे. हा रोग जंगली पक्ष्यांपासून पाळीव पक्ष्यांमध्ये पसरतो. बर्ड फ्लू मानवांना देखील संक्रमित करू शकतो, परंतु याची शक्यता फारच कमी आहे. धुळीत असलेल्या विषाणूपासूनही या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते. याशिवाय कोणत्याही संक्रमित वस्तूला स्पर्श करूनही संसर्ग होऊ शकतो. (वाचा - Bird Flu H5N1 Pandemic: बर्ड फ्लू महामारी, COVID-19 पेक्षाही भायानक, जगासमोर नव्हे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता)

बर्ड फ्लूची लक्षणे -

  • तीव्र शरीर वेदना
  • उच्च ताप
  • सतत खोकला
  • धाप लागणे

बर्ड फ्लू टाळण्यासाठी खबरदारी -

बर्ड फ्लू टाळण्यासाठी, संक्रमित पक्ष्यांना हाताळणाऱ्यांनी हातमोजे घातले पाहिजेत.

हात साबणाने आणि पाण्याने वारंवार धुवावेत.

फक्त चांगले शिजवलेले मांस आणि अंडी खा. कच्चे अंडी किंवा मांस खाऊ नका.

कोणताही मृत किंवा आजारी पक्षी आढळल्यास पशु कल्याण विभाग किंवा स्थानिक शासकीय विभागाला कळवा.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, हा विषाणू पक्ष्यांच्या आतड्यांवर किंवा श्वसन प्रणालीवर हल्ला करतो. त्यामुळे पक्षी आजारी पडतात.