Pradhan Mantri Awas Yojana: स्मार्ट सिटी अभियानाला 6 वर्ष पूर्ण; पुणे, पिंपरी चिंचवडला मिळाले 4 स्टार
Pradhan Mantri Awas Yojana (Photo Credit: PBNS)

नागरी परिवर्तनाला (Urban Transformation) आज 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. गृह निर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने पीएमएवाय-शहरी, अमृत आणि स्मार्ट सिटी अभियानाच्या 6 वर्षपुर्तीनिमित्त कार्यक्रम साजरा केला आहे. या कार्यक्रमात हवामान स्मार्ट सिटी मुल्यांकना अंतर्गत पुणे (Pune), पिंपरी चिंचवडला (Pimpri Chinchwad) 4 स्टार मानांकन मिळाले आहेत. तसेच पीएमएवाय-शहरी अंतर्गत 1.12 कोटी घरांना मंजुरी आणि 83 लाख घरे निर्माणाधीन आहे. स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत राबवण्यात येणारे काही महत्वाचे उपक्रम या वर्धापन दिन कार्यक्रमात ठळकपणे दर्शवण्यात आले. केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी व्यवहार राज्य मंत्री हरदीप एस पुरी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे प्रधान सचिव, महानगर पालिकांचे आयुक्त,स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 2022 पर्यंत सर्वाना घर पुरवण्याच्या पूर्ततेच्या दृष्टीकोनातून पीएमएवाय-यु ने उत्तम कामगिरी नोंदवली आहे. पीएमएवाय-यु अंतर्गत 1.12 कोटी घरांना लाभार्थीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 83 लाख घरे निर्माणाधीन असून 48 लाखाहून अधिक घरे पूर्ण झाली आहेत. पीएमएवाय-यु च्या अंमलबजावणी मध्ये सहकार्यात्मक संघीयवादाचे तत्व अमलात आणले आहेत. मंत्रालयाने प्रकल्प आखणी ,मुल्यांकन आणि मंजुरीचे अधिकार केंद्रशासित प्रदेशांकडे सोपवले आहेत. या अभियानाच्या यशाचे श्रेय जोमदार वित्तीय मॉडेलला जात आहे. थेट लाभ हस्तांतरण हा यातला महत्वाचा घटक आहे. याशिवाय देखरेखीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर, तंत्रज्ञान विषयक नवोन्मेश, अतिरिक्त अर्थसंकल्पीय संसाधनाद्वारे अतिरिक्त निधी यांचाही यात वाटा आहे. अभियाना अंतर्गत आतापर्यंत मंजूर करण्यात आलेल्या घरांसाठी 7.35 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असून 1.81 लाख कोटी रुपयांचे केंद्रीय सहाय्य आहे. हे देखील वाचा- 7th Pay Commission: DA आणि DR Arrears बद्दल सोशल मीडियात व्हायरल होणारे पत्रक खोटे, अर्थमंत्रालयाने दिले 'हे' स्पष्टीकरण

इतर क्षेत्राशी संलग्न असल्यामुळे या क्षेत्रात सरकारकडून केलेल्या सध्याच्या गुंतवणुकीमुळे अंदाजे 689 कोटी मानव दिवस रोजगार निर्मिती ज्याचे रुपांतर 246 लाख रोजगारात होते आणि 370 लाख मेट्रिक टन सिमेंट आणि 84 लाख मेट्रिक टन पोलाद उपयोगात आले. गेल्या काही महिन्यात सर्व 100 स्मार्ट सिटीनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि गेल्या दोन वर्षात प्रगल्भता आणि प्रगतीही दर्शवली. एकूण 42 शहरांनी प्रमाणपत्र स्तर प्राप्त केला त्यापैकी पुणे, पिंपरी-चिंचवड, भोपाळ आणि सुरत या शहरांनी कनेक्टेड प्रमाणपत्र प्राप्त केले.