Wayanad Landslide Death Toll: केरळ राज्यातील वायनाडमध्ये मंगळवारी झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Wayanad Landslide Death)आहे. गेल्या चार दिवसांत राबवलेल्या बचावकार्यात 358 मृत्यू नागरिकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहे. बचाव कार्याचा आजचा पाचवा दिवस आहे. रेसक्यू टीमने शोध मोहिम तीव्र करत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रडारचा (Radar)वापर करण्याचे सुरू केले आहे. केरळ सरकारने केंद्र सरकारला बचाव कार्यात मदत करण्यासाठी रडार पाठवण्याची विनंती केली होती. दिल्लीसह उत्तर कमांडचे एक झेव्हर रडार आणि तिरंगा माउंटन रेस्क्यू ऑर्गनायझेशन, दिल्लीचे चार रीको रडार शनिवारी वायुसेनेच्या विमानातून वायनाड येथे आणण्यात आले. (हेही वाचा:Kerala Landslides: आदिवासी कुटुंबाला वाचवण्यासाठी वन अधिकाऱ्यांच्या धोकादायक ट्रेक, वडिलांसह मुलांना केलं रेस्क्यू (Watch Video) )
वायनाडमध्ये अद्याप 200 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी बचावकार्यात लष्कर, नौदल, एनडीआरएफ, राज्याचे आपत्ती निवारण दल, पोलिस, अग्निशमन दलाचे जवान सहभागी झाले आहेत. मेपाडी भागात भूस्खलन झाले असून याचा फटका मुंडक्की, चूरामाला आणि नूलपुळ्ळा या गावांनाही देखील बसला. त्यामुळे शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आतापर्यंत अनेकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. (हेही वाचा:Rahul Gandhi Wayanad Visit: केरळने एवढा भीषण विध्वंस पाहिला नाही; वायनाड भूस्खलनावर राहुल गांधीची प्रतिक्रीया )
या घटनेनंतर पिनाराई विजयन सरकारने राज्यात दोन दिवस अधिकृत शोक जाहीर केला होता. वायनाडच्या चुरामाला येथील मशीद आणि मदरसांच रुग्णालयात रूपांतरण करण्यात आलं आहे. हा भाग भूस्खलनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी एक आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाने (PRD) वायनाड भूस्खलन मदत प्रयत्नांना जिल्हा आणि राज्यस्तरीय माध्यम नियंत्रण कक्ष उघडले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार शोध आणि बचाव कार्यासाठी पोलिस ड्रोन आणि श्वान पथके तैनात करण्यात आली आहेत.
केरळ सरकारने डीएनए, दंत नमुने गोळा करणे आणि अवशेष दफन करण्यासह इतर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक मृत शरीर किंवा शरीराच्या भागाला एक ओळख क्रमांक नियुक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह किंवा शरीराच्या अवयवांची ओळख पटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि ओळख पटवणे शक्य नसेल, तर चौकशीच्या वेळेपासून 71 तासांनंतर पुढील कारवाईसाठी मृतदेह जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करावा असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
वायनाडमध्ये भूस्खलनासारखी विनाशकारी शोकांतिका कधीच पाहिली नाही. हा मुद्दा केरळ सरकार आणि केंद्राकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय, भूस्खलनग्रस्त जिल्ह्यातील बाधित कुटुंबांसाठी काँग्रेस 100 हून अधिक घरे बांधणार असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. एका घटनेत वायनाडमध्ये केरळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ तासांच्या ऑपरेशननंतर दुर्गम आदिवासी वस्तीतून सहा मुलांची सुटका केली. भारतीय हवामान विभागाने (IMD) वायनाडमध्ये शनिवार आणि रविवारी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात 6 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.