Bigg Boss Marathi 2, Episode 20 Preview: शिवानी सुर्वे 'बिग बॉस'च्या घराबाहेर पडण्यावर ठाम; पराग आणि वीणा मधील वादामुळे टीम फुटणार?
BBM2 (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठी 2 च्या घरात आता शह - काटशाह यांचा खेळ रंगायला सुरूवात झाली आहे. यामध्ये घरात खेळाव्यतिरिक्त देखील ग्रुप पडले आहेत. रूपाली, वीणा, पराग आणि किशोरी एकीकडे आणि बाकी घरातील सदस्य दुसरीकडे असा खेळ रंगतोय. घरातील रूपाली, वीणा, पराग आणि किशोरी हा ग्रुप एकमेकांसाठी अगदी जीवाभावाचा आहे. त्यामुळे हा गट फोडण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहे. परागलादेखील वीणा दुसर्‍या ग्रुपकडे झुकतेय का? असा संशय आल्याने दोघांमध्ये आता वाद रंगायला सुरूवात झाली आहे. हा समज-गैरसमज आहे की स्ट्रेटिजीचा एक भाग आहे. हे हळूहळू समजेल.

घरात 'शाळा सुटली पाटी फुटली' यानंतर पाणी जपून वाचवा असं एक टास्क वाट्याला आलं आहे. यामध्ये घरातील सदद्यांची पुन्हा दोन गटांमध्ये विभागणी होणार आहे. पाण्यावरून पुन्हा घरात रणकंदन होणार का? हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. बिग बॉस मराठी 2 च्या घरात आत्तापर्यंत काय काय झालंय? 

शिवानी सुर्वेची बिग बॉसकडे पुन्हा विनंती

दिवसाअखेर पुन्हा शिवानी सुर्वेला अश्रू अनावर होतात आणि घरातून बाहेर पडण्याची तिची प्रक्रिया वेगवान करण्याची विनंती तिने बिग बॉसला केली आहे. शिवानीची विनंती लक्षात घेता बिग बॉसने तिला कन्फेशन रूममध्ये तर बोलावलयं पण पुढे काय होणार? आजच ती घराबाहेर पडणार का? याची उत्सुकता आता वाढली आहे. बिग बॉस मराठी 2 ची चर्चित स्पर्धक 'शिवानी सुर्वे'चा बॉयफ्रेंड 'अजिंक्य' नेमका कोण? (Photos)

मागील आठवड्यात मैथिली जावकर घराबाहेर पडली आहे. तर यंदाच्या आठवड्यात पराग कान्हेरे, किशोरी शहाणे, नेहा शितोळे, दिगंबर नाईक, माधव देवचक्के आणि अभिजीत बिचुकले नॉमिनेशनमध्ये आहेत.