Bigg Boss Marathi 2, 13 June, Episode 19 Updates: नव्या कॅप्टनच्या शर्यतीमध्ये टीम A कडून दिगंबर नाईक; तर टीम B कडून वीणा, पराग नापास
BBM2 EP19 (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठी 2 च्या घरात आजच्या आठवड्यात लक्झरी बजेट आणि कॅप्टनसीच्या शर्यतीसाठी घरातील सदस्यांना 'शाळा सुटली पाटी फुटली' हे साप्ताहिक कार्य दिले आहे. यामध्ये आजच्या (13 जून) भागात प्रेमाचा तास घेण्यासाठी पराग कान्हेरे वर्गात आला. अपेक्षेप्रमाणे बिग बॉसच्या सदस्यांना आज पराग-रूपाली, वीणा-शिव आणि बाप्पा-सुरेखा पुणेकर यांच्यामधील केमेस्ट्री पहायला मिळाली. तर टीम बदलल्यानंतर अभिजीत बिचुकल्यांच्या वर्गात बिग बॉसवायीसांना धम्माल इंग्रजीचा वर्ग पहायला मिळाला.

दरम्यान गाण्याचा वर्गात माधव आणि त्यापाठोपाठ अभिजीत केळकरही नापास झाला. किशोरी शहाणे या मुख्याध्यापकांनी नापास झालेल्यांमधून विद्याधर जोशीला पुन्हा पास केलं होतं मात्र टीम A मधून केवळ दिगंबर नाईक निवडला गेला आहे. बिग बॉस मराठी 2 ची चर्चित स्पर्धक 'शिवानी सुर्वे'चा बॉयफ्रेंड 'अजिंक्य' नेमका कोण? (Photos)

बिग बॉसच्या घरात आता विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या भुमिकांमध्ये खांदेपलट झाली आहे. टीम B विद्यार्थी असताना माधव मुख्याध्यापक आहे तर इतर शिक्षक बनले आहेत. वीणा जगताप आणि पराग कान्हेरे या दोन नावांना यंदाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीमधून बाहेर काढण्यात आलं आहे.

खेळ संपल्यानंतर निवांत झालेल्या घरात रूपाली आणि परागमध्ये लुटूपुटूचं भांडण बघायला मिळालं आहे. पराग मुद्दामून रूपालीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तिने त्याच्यावर केला आहे. शुगर फ्री ज्युस बनवणं हे त्याच निमित्त ठरलं. पण दिवसाअखेर त्याचं भांडणही मिटलं. सध्या अभिजीत बिचुकले पुन्हा खेळामध्ये शिरले आहेत. घरात स्वार्थी कोण? यावरून क्रम लावत त्यांच्या डोक्यात काही नवा प्लॅन रंगत आहे. यंदा ते नॉमिनेशनही असल्याने ते काही तडाखे बांधत असावेत. आता अजूनही साप्ताहिक कार्याचा शेवटचा टप्पा बाकी आहे. त्यानंतरच यंदाच्या कॅप्टन्सीच्या दावेदारांचे चेहरे स्पष्ट होणार आहेत.