प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Truebil)

नवी गाडी घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. त्यामुळे नवी कार खरेदी करण्याचा आनंद व्यक्त करताच येत नाही. परंतु काही वेळेस नवी गाडी खरेदी करण्याचा अनुभव काही ग्राहकांसाठी कटू ठरु शकतो. यामध्ये ग्राहकाची कोणतीच चुकी नसते. तर काही डिलर्स त्यांचा Pending Stock काही कारणांमुळे विक्री करु शकत नाहीत. यामुळे ते ग्राहकांच्या नकळत त्यांना जुनी गाडी विक्री करतात. काही ग्राहकांना गाडी खरेदी करण्यापूर्वी त्या संबंधित अधिक माहिती नसल्यास किंवा सेल्स रिप्रेजेंटेटिव्ह यांची विनम्रतेसह ग्राहकाला आकर्षित करण्याच्या पद्धतीमध्ये फसतात.  यामुळे डिलरला ग्राहकाला सहजपणे नव्या कारच्या खाली जुनी गाडी विक्री करण्याचा मार्ग मोकळा होतो.

काही वेळेस फसवणूक करणारे डिलर्स आणि कारची चोरी करणाऱ्या व्यक्ती चोरी केलेली गाडी विक्री करण्यासाठी खोटी कागदपत्रे बनवतात. त्यामुळे ग्राहकाला एखाद्या व्यक्तीने वापरलेली गाडी दिली जाते. त्यामुळे अशा सर्व गोष्टींपासून वाचण्यासाठी काही ट्रिक्स जरुर लक्षात ठेवा. ग्राहकाला  Vehicle Identification Number (VIN), व्हेकल आयडेंटिफिकेशन क्रमांक डिकोट करता येणार आहे. जसे तुम्ही समजता आहात डिकोट करणे कठीण आहे. परंतु तसे नसून अगदी सोपे आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही सोप्प्या टीप्स सांगणार असून त्याच्या मदतीने तुमची फसवणूक होण्यापासून मदत होणार आहे.(Hero Xtreme 160R भारतात लॉन्च, 4.7 सेंकदात पकडणार 0-60 kmph चा वेग)

>>प्रत्येक गाडीसाठी एक युनिक क्रमांक दिला जातो. त्याला VIN क्रमांक असे म्हटले जाते. याचा उपयोग करुन महिना आणि वर्ष कोणते यासंबंधित अधिक माहिती मिळू शकते. गाडीवर VIN हे इंजिनच्या येथे लिहिलेले असून 19 अंकी असते. आधार कार्डवरील क्रमांकासारखेच हे असून प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक असतो. तो डुप्लिकेट केला जाऊ शकत नाही.

>>VIN एक अल्फान्युमेरिक कोड असून त्यामुळे कोणता महिना आणि वर्ष याबबात माहिती दिली जाते. VIN डिकोड करण्यासाठी विविध मार्ग आहेत. ऑटो निर्माता VIN गाडीच्या मॅन्युफॅक्चरिंगची वेळ एम्बेड करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करतात.

>> कार कंपन्या वाहन ज्या महिन्यात निर्माण केले आहे त्याचा महिनला अंग्रेजी वर्णमालेनुसार विभागतात. जसे A अक्षराचा वापर वर्ष 2010 साठी करण्यात येतो. तर Y वर्णक्षराचा वापर 2030 चे वर्ष दर्शवते. (Renault ने बंद केली दमदार लूक असणारी SUV, कंपनीने वेबसाईट्सवरुन सुद्धा हटवली)

तर वरील काही गोष्टी लक्षात घेता डिलरकडून कार खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा. तसेच जर तुमची फसवणूक होत असल्यास त्यासंबंधित योग्य तो निर्णय घ्या.