Renault Captur (Photo Credits-Twitter)

फ्रान्सची कार निर्माता कंपनी Renault Captur भारतीय बाजारात फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे. जी आता कंपनीने त्यांच्या वेबसाईट्स वरुन हटवली आहे. Capture असे ऐकमेव मॉडेल आहे जे Renault ने BS6 उत्सर्जन मानकांच्या अनुरुप केले नाही आहे. याच कारणास्तव कंपनीने हे मॉडेल बंद केले आहे. याबाबत एक शक्यता अशी सुद्धा आहे की, Renault नंतर ही BS6 इंजिनसह फेसलिफ्ट मॉडेलच्या आधारावर भारतीय बाजारात उतरवतील. मात्र कंपनीने याबाबत अद्याप अधिकृत काही घोषणा केलेली नाही.

Renault Captur भारतीय बाजारात 2017 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. ग्लोबल काउंटरपाटर्सच्या बाजारात भारतीय मॉडेल सारखी B0 प्लॅफॉर्मवर बनवण्यात आले होते. ज्यावर Duster बनवण्यात आली होती पण त्या थोडे बदल करण्यात आले होते. परंतु भारतीय ग्राहकांना या गाडीसाठी आकर्षित करण्यास कंपनी अयशस्वी ठरली. भारतीय बाजारात ही गाडी Hyundai Creta, Kia Seltos, MG Hector आणि Nissan Kicks यांच्या तुलनेत कॉम्पैक्ट एसयुव्ही स्पेस ही 2019 मध्ये त्याची सर्वात कमी विक्री झाली होती. याच कारणामुळे कंपनीने Renault Captur वर 3 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट सुद्धा दिला होता.(Mahindra कंपनी घेऊन येणार 2 नव्या शानदार SUV, जाणून घ्या अधिक)

भारतीय बाजारात लॉन्च झाल्यानंतर Renault यांची Captur च्या फक्त 6618 युनिट्सची विक्री झाली होती. ऐवढेच नाही तर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे Renault India यांची भारतीय बाजारात त्यांची एक ही गाडी विकली गेली नाही आहे. कंपनी सध्या त्यांची सब-कॉम्पैक्ट एसयुव्ही वर काम करत आहे. जी भारतीय बाजारात लवकरच लॉन्च करण्यात येणार असून ती Renault-Nissan च्या CMF-A+ मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. ज्यावर कंपनी Triber बनवत आहे.