Mahindra कंपनी घेऊन येणार 2 नव्या शानदार SUV, जाणून घ्या अधिक
Representative Image (Photo Credits: mahindratuv300.com)

महिंद्रा अॅन्ड महिंद्रा नव्या शानदार कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. कोरोना व्हायरसमुळे कंपनीने त्यांत्या नव्या मॉडेल्स लॉन्च केल्या नाहीत. महिंद्रा त्यांची बहुप्रतिक्षित एसयुव्ही नवी Mahindra XUV500 आणि Scorpio पुढील वर्षात लॉन्च करणार आहे. या वर्षात कंपनीने त्यांच्या दोन नव्या धमाकेदार एसयुव्ही भारतीय बाजारात उतरवणार आहेत.Mahindra Thar ची गेल्या काही महिन्यांपासून प्रतिक्षा करण्यात येत आहे. न्यू-जनरेशन थार ऑक्टोंबर मध्ये लॉन्च होणार आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत लुक आणि केबिन मध्ये मोठे बदल दिसून येणार आहेत. या ऑफ-रोड एसयुव्ही मध्ये सर्वात मोठा बदल इंजिन मध्ये असणार आहे. न्यू-जनरेशन थार मध्ये 2.0 लीटर mStallion टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि अपग्रेडेड 2.2-लीटर mHawk डीझल इंजिन मिळणार आहे. पेट्रोल इंजिन 190bhp ची पॉवर आणि 380Nm टॉर्क, तर डिझेल इंजिन 140bhp ची पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करणार आहे. खास गोष्टी अशी आहे की, थारच्या दोन्ही इंजिनसह ऑटोमेटिक गिअरबॉक्स ऑप्शन मिळणार आहे.

New Generation Thar मध्ये धमाकेदार फिचर्स ग्राहकांना मिळणार आहेत. यामध्ये रिमुव्हेबल रुफ पॅनेल्स, ऑप्शन फॅक्ट्री-फिटेड हार्ड टॉप, एलईडी डीआरएल, टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम, मल्टी-इन्फर्मेशन डिस्प्ले, क्लायमेट कंट्रोल, क्रुज कंट्रोल, रियर डिस्क ब्रेक आणि फॉरवर्ड फेसिंग रियर सीट्ससह अन्य फिचर्स मिळणार आहेत.(Triumph Bonneville T100 Black आणि Bonneville T120 Black भारतात लॉन्च) 

XUV300 Sportz ही महिंद्रा कंपनीची दुसरी एसयुव्ही XUV300 Sports आहे. फेब्रुवारी मध्ये झालेल्या ऑटो एक्सपो मध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात ती लॉन्च करण्यात आली होती. पण या वर्षाच्या अखेरीस बाजारात उतरवण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. ही एक स्टँडर्ड XUV300 चे स्पोर्टी आणि अधिक पावरफुल वर्जन आहे. यामध्ये 1.2 लीटर mStallion टर्बो पेट्रोल इंजिन मिळणार आहे. जे 130bhp ची पॉवर देणार आहे. स्टँडर्स पेट्रोलच्या तुलनेत याची पॉवर 20bhp पेक्षा अधिक आहे.(Maruti Suzuki Alto: मारुती सुझुकीच्या ऑल्टोचा नवीन विक्रम; सलग 16 वर्षे ठरली भारतामधील सर्वाधिक विकली जाणारी कार)

स्टँडर्स XUV300 तुलनेत XUV300 Sportz मध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. समोरील दरवाज्यांवर Sportz च्या बॅजिंगसह एसयुव्ही पर नवी बॉडी ग्राफिक्स आणि ब्रेक कॅलिपर्सवर रेड फिनिशिंद देण्यात आली आहे. सीट्सवर कॉन्ट्रास्ट रेड स्चिचिंगस डॅशबोर्डवर रेड हायलाइट्स आणि ब्लॅक इंटीरियर थीम XUV300 Sportz च्या कॅबिनला स्टँडर्ड मॉडेलपेक्षा वेगळा लूक देण्यात आला आहे.