Triumph Bonneville T100 Black (Photo Credits-Twitter)

Triumph मोटारसायकल इंडिया यांनी त्यांची भारतीय बाजारात Triumph Bonneville चे दोन वेरियंट्स लॉन्च केले आहेत. कंपनीने यामध्ये Triumph Bonneville T100 आणि Triumph Bonneville T120 चे ब्लॅक अॅडिशन बाजारात उपलब्ध करुन दिले आहेत. या दोन्ही बाईक्स रेग्युलर Triumph Bonneville T100 आणि T120 वर आधारित असून त्यात फक्त कलर स्किमचे अंतर आहे. दोन्ही वेरियंट्स आता ऑल-ब्लॉक लुक्ससह येणार आहेत. Triumph Bonneville T100 याची किंमत 8.87 लाख रुपये आहे. तर T120 ची किंमत तब्बल 9.97 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

तांत्रिकरित्या मधील फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास ती स्टॅंडर्ड वेरियंट सारखीच आहे. Triumph Bonneville ही जागतिक स्तरावर Triumph पेक्षा सर्वाधिक विक्री करण्यात येणारी मोटारसायकल आहे. T100 या बाईकमध्ये कंपनीने मॅट ब्लॅक किंवा ग्लॉस बॅक रंगाचे फिनिशिंग दिले आहे. तर T120 मध्ये एक मॅट ग्रॅफाइट फिनिशिंग दिले आहे. ब्लॅक्ड आउट्स पार्ट्स बाबत सांगायचे झाले तर यामद्ये इंजिन, व्हिल्स, बॉडीवर्क, मिरर्स, हेडलाइट बेजेल आणि टर्न इंडीकेटर्स मिळणार आहेत.(Ola Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर)

Bonneville T100 ब्लॅकमध्ये एक 900cc, समांतर द्विन इंजिन दिले असून जे 5900 RPM वर 54bhp पॉवर आणि 3,230 RPM 80Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. तसेच यामध्ये कंपनीने 5-स्पीड गिअरबॉक्स दिले असून राइड-बाय-वायर, डुअल-चॅनर ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, USB चार्जिंग सॉकेट आणि एक क्लासिक द्विन-पॉड इंन्ट्रु्युमेंट कंसोल देण्यात आला आहे.(शाहरुख खान बनला 2020 Hyundai Creta चा पहिला भारतीय मालक, जाणून घ्या या लक्झरी कारची वैशिष्ट्ये)

Bonneville T120 यामध्ये कंपनीने हायटॉरर्क 1200cc, 8 वाल्व पॅरेलल द्विन इंजिन दिले आहे. जे 270 डिग्री फायरिंग इंटरवल आणि सिंगल ओव्हरहेड कॅमसह येणार आहे. हे इंजिन 6550 RPM वर 79bhp ची पॉवर आणि 3100RPM वर 105NM टॉर्क जनरेट करतात. तसेच 6 स्पीड गिअरबॉक्स आणि स्टँडर्स फिचर्सच्या आधारावर एक LED डेटाइम रनिंग लाइट, डुअल चॅनल ABS आणि राइड-बाय- वायर, टू रायडिंग मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल, हीटेड ग्रिप्स, सेंटर स्टँड आणि एक इंजिन इ-मोबिलायझर देण्यात आला आहे.